solapur

महापालिकांच्या निकालामुळे वाढले भाजपचे मनोबल

महापालिकांच्या निकालामुळे वाढले भाजपचे मनोबल

आजी-माजी नेते भाजपच्या वाटेवर का?

संचार वृत्त अपडेट 

राज्यभर नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून सोलापूर महापालिकेवर भाजप ने एक हाती सत्ता मिळवली आहे. या विजयामुळे माळशिरस तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांचे मनोबल उंचावले आहे. तालुक्यातील अनेक आजी-माजी इतर पक्षांचे पदाधिकारी व नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आता रंगू लागली असून यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मोठे फेरबदल होण्याची चिन्हे तालुक्यात दिसत आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच सुरू झाली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना सोलापूर जिल्ह्यावर राष्ट्रवादी(श.प.),काँग्रेस ची पकड मानली जात होती. परंतु महापालिका निवडणुकीच्या काळात या दोन्ही पक्षांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निकालाने राजकीय चित्र पालटले असून आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अनेक इतर पक्षांचे पदाधिकारी भाजपच्या तंबूत शिरण्यासाठी इच्छुक असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे भाजपच्या यशानंतर अनेकांच्या नजरा आता भाजपमध्ये उमेदवारीकडे वळल्या असून सध्या तालुक्यात ठीक ठिकाणी भाजप पक्षप्रवेश सुरू आहेत. राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी(श.प.) व राष्ट्रवादी(अ.प.) गटाला कडवे आव्हान मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button