solapur

माळशिरस पं.स.मध्ये स्वीकृत सदस्य घेण्याचे खासदार व आमदार यांचे आश्वासन

माळशिरस पं.स.मध्ये स्वीकृत सदस्य घेण्याचे खासदार व आमदार यांचे आश्वासन

संचार वृत्त अपडेट 

मागील महिन्यात राज्यातील नगरपालिका नगरपंचायत च्या निवडणुका संपन्न झाल्या आता राज्यातील जि.प. व पं.स. निवडणुका जाहीर झाल्या असून त्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणूक प्रक्रिया १६ जानेवारी पासून चालू झाली असून माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद चे ९ गट आणि पंचायत समितीचे ११ गण आहेत १६ जानेवारी ते २१ जानेवारीपर्यंत उमेदवार दाखल करण्याची मुदत असून उमेदवार कागदोपत्र जमा करत असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात गर्दी होत आहे. उमेदवारी माघार घेण्याची तारीख २७ जानेवारी असून याच दिवशी तालुक्यातील जि. प. व पंचायत समिती उमेदवाराचे चित्र स्पष्ट होणार आहे. आणि ५ तारखेला मतदान होऊन सहा तारखेला मतमोजणी होणार आहे.


त्या अनुषंगाने माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.) पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी चर्चेअंती शब्द दिला आहे की पंचायत समिती निवडणुकीनंतर पंचायत समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांना स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करणार असल्याचे आश्वासन राजू शेट्टी यांना या दोन्ही नेत्यांनी दिले असल्याचे अजित बोरकर यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले.
या घडामोडीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाला पाठिंबा दिला असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
काही दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुक्यात ऊस दराबाबत तीव्र आंदोलन छेडल्यानंतर   कारखानदारांना वाढीव दर देण्यास भाग पाडले   ऊसास वाढीव दर दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे त्याचा फायदा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नक्कीच होणार असल्याचे यावेळी अजित बोरकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button