एचएनडी बचावासाठी जैन बांधव एकवटले

एचएनडी बचावासाठी जैन बांधव एकवटले
संचार वृत्त अपडेट
सकल जैन समाज अकलूज व तालुका माळशिरस, जीवन सहारा परिवार, जैन सोशल ग्रुप, महावीर दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, दहिगाव यांच्या संयुक्त विद्यामाने पुणे येथील HND गुरुकुल गैर विक्री संदर्भात महाराष्ट्र व संपूर्ण भारतात जैन समाज आक्रमक झाला असुन त्याच्या निषेधार्थ भातभर मुक मोर्चा, मोटर सायकल रॅली द्वारे त्या त्या गावातील कलेक्टर, उप जिल्हा अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. आज संपुर्ण भारतात 100 च्या पेक्षा जास्त ठिकाणी निदर्शन करून निवेदन देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून अकलूज येथे मोटरसायकल रॅली ज्या मध्ये 300 च्या वर जैन समुदायतील युवक व ज्येष्ठ व्यक्तींनी सहभाग नोंदवला.

उप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या समुदायला संभोदीत करताना दहिगाव मंदिरचे सक्रेटरी संजय दोशी यांनी hnd चा लढा सेल डिड रद्द होई पर्यंत चालू ठेवण्याचे आव्हान केले.
त्यानंतर बोलताना सनमती दलाचे संस्थापक माननीय मिहीरभाई गांधी यांनी आपल्या समाजाची एकजूटता आपल्याला निश्चित यश देईल असे संभोधित केले.

या मोर्च्याचे नियोजन अमित दोशी (CA), सागर फडे , योगेश गांधी, शीतल व्होरा, शिरीष फडे,मंगेश दोशी यांनी केले व आपले विचारमांडले.
मीडिया व इतर नियोजन पियुष दोशी, प्रतीक दोशी यांनी केले.यामध्ये महिलाही मोट्या संख्येने उपस्थित होत्या. सपना दोशी यांनी आपले विचार मांडले.माननीय उप जिल्हाधिकारी यांनी कमिटी कडून निवेदन स्वीकारले व सरकार पर्यंत जैन समाज्याच्या भावना पोहचविण्याचे आश्वासन दिले.शेवटी मंगेश दोशी यांनी गरुदेव 108 गुप्तीनंदी महाराजांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली हा लढा आपण जिंकणार आहोतच पण आपण गुरूंच्या आदेशाप्रमाणे सतर्क राहून हा लढा शेवट पर्यंत एकजूट राहून लढण्याचे आव्हान करून रॅलीची सांगता केली.



