solapur

कोणत्याही समस्येवर जीवन संपवणे हा उपाय नाही जीवन संपविल्यामुळे समस्या सुटत नाहीत योग्य मार्ग काढून सुखी जीवन जगले पाहिजे;किशोरसिंह माने पाटील

अत्माहात्या करणे म्हणजे माणसाने सुखी जीवनाकडे फिरवलेली पाठ आहे – किशोरसिंह माने- पाटील.

युवकांनी मनावर संयम ठेवून धैर्याने वागावे असा मैलीक सल्ला हि त्यांनी दिला.

संग्रामनगर (संजय लोहकरे यांजकडून)
देवाने माणसाला एकदाच जन्म दिला आहे.तो सुख,समाधान व जीवनातील आनंद घेण्यासाठी दिला आहे.पण आजकाल तरूण वर्ग विविध व्यसनाच्या आहारी जाऊन टेन्शन घेऊन जीवन जगत आहेत.यातून ते शेवटी अत्माहात्याचा मार्ग आवलंबतात. अशी प्रतिक्रिया अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील यांनी व्यक्त केले आहे.
अकलूज परिसरात गेल्या दोन वर्षांपासून तरूण पिढी अत्माहात्याचा मार्ग अवलंबत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.आजचा युवक उद्याचा देश घडविणारा नागरिक आहे.पण तरूणपणातच हा युवक व्यसनाच्या आहारी व खाजगी सावकारांच्या व्याजाचे टेन्शन घेऊ पुढचा व मागचा विचार न करता आपल्या जीवन यात्रेचा प्रवास अत्माहात्या करून संपवत आहे.अशी परिस्थिती जर पुढे राहिली तर भारत देशाचे भवितव्य काय असा प्रश्न निर्माण होतो.हा प्रश्न एकट्याने अत्माहात्या करून सुटत नाही.तर तो सामोपचाराने घेतला पाहिजे. आज एका युवकाने अत्माहात्या केली तर प्रश्न सुटत नाही उलट त्याच्या घरातील पत्नी मुलाबाळांना मानसिक त्रास सहन करत जीवन जगावे लागत आहे.जर त्याच्या घरात वयोवृद्ध आई वडील असतील तर त्यांना जिवंतपणी मरण यातना सहन कराव्या लागतात.आज आपल्या घरातील कर्तृत्ववान मुलगा जर आपल्या डोळ्यासमोर गेला तर त्या वयोवृद्ध बिचा-यांनी न्याय तरी कुणालाकडे मागायचा.अशी अवस्था काही काही घरातून दिसत आहे.त्यामुळे तरूणांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नका व व्यापार करण्यासाठी व व्यवसायासाठी खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे काढून नका.असे त्यांनी तरूणांना आवाहन केले आहे.उद्या हेच खाजगी सावकार आपले मालक होतात.व नंतर मोबाईलवर घरातील महिलांविषयी अश्लील भाषात बोलतात व चारचौघात अब्रुचे धिंडोरे काढणे असे प्रकार सुरू होता.जर अशा संकटात जर युवक अडकला असेल तो प्रश्न आपल्या परिवारासमोर मांडावा.त्या तरूणाने आपल्या मित्र मंडळींचा सल्ला घेणे.त्यातून योग्य मार्ग काढावा.तरूणांनी व्यवसाय करताना खाजगी सावकारांच्या कधी ही हात पसरू नका.जेवढे आपल्या झेपेल तेवढे सरकारी बॅंकांकडून कर्ज घ्या.पण कृपया करून अत्माहात्याचा विचार करून नका.असे त्यांनी तरूणांना आवाहन केले आहे.
उगवलेला सूर्य मावळतो हा निसर्ग नियम आहे.प्रत्येकाच्या जीवनात एक वेळ अशी येते.ती परीक्षाच असते त्यामध्ये पास होणे गरजेचे असते.या समस्येवरून कवि मंगेश पाडगावकर यांच्या कवितेची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.”सांगा कसे जगायचे… कण्हत कण्हत की…गाणे म्हणत तुम्हीच ठरवा…डोळे भरून तुमची आठवण… कुणी तरी काढतच ना..!

प्रत्येकाच्या जीवनात समस्या येत असतात.कुणाला कौटुंबिक, आर्थिक,सामाजिक,वैयक्तिक समस्या असतात.समस्यांवर मात करून पुढील आनंदी जीवन जगण्याची वाटचाल करणे महत्त्वाचे आहे.कोणत्याही समस्येवर आपले जीवन संपविणे हा काही उपाय नाही आहे.जीवन संपविल्यामुळे समस्या सुटत नाही.हे आयुष्य एकदाच आहे पुन्हा जन्म नाही आहे.आलेल्या संकटातून योग्य मार्ग काढून सुखी जीवन जगले पाहिजे.

किशोरसिंह माने-पाटील

मा.सरपंच अकलूज ग्रामपंचायत अकलूज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button