माढा विधानसभा निवडणुकीत कोणाकडून उमेदवारी घ्यायची आ.रणजितसिंह मोहिते पाटील कुंपणावर
माढा विधानसभा निवडणुकीत कोणाकडून उमेदवारी घ्यायची आमदार रणजितसिंह मोहिते पाटील कुंपणावर
संचार वृत्त अपडेट
श्रीपूर(बी.टी.शिवशरण)
अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लागली आहे संपुर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या माढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कडून कोणाला उमेदवारी मिळणार या बाबत कमालीची उत्सुकता वाढली आहे तुतारी हातात घेऊन निवडणूक लढवणार या स्पर्धेत अकलूजचे शिवतेज सिंह मोहिते पाटील अभिजित पाटील आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे संजय कोकाटे हे सुरवातीपासून स्पर्धेत आहेत आणखी एका वजनदार नेत्याचे नाव पुढे आले आहे ते म्हणजे भाजपचे विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे सध्या अतिशय खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कडून तुतारी हातात घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे समजते त्यांनी जसे सावज टप्प्यात आल्यावर शिकार करायची हे धोरण ठेवले आहे आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कडून उमेदवारी दिली तर ते भाजपकडून माढा विधानसभा निवडणूक लढणार अशी शक्यता आहे आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कडून तुतारी अधिकृत उमेदवारी दिली तर ते रणजितसिंह शिंदे यांचे विरोधात लढणार रणजितसिंह शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे परंतु आमदार बबनदादा शिंदे हे तुतारी चिन्हावर रणजितसिंह शिंदे यांनी निवडणूक लढवावी असे आग्रही आहेत आमदार बबनराव शिंदे यांनी माध्यमातून जाहिर केलं आहे जर तुतारी चिन्ह नाही मिळाले तर अपक्ष लढू येत्या काही दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल मात्र माढा विधानसभा निवडणुकीत आता पासूनच चुरस निर्माण झाली आहे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील सध्या द्विधा अवस्थेत आहेत ते कोणत्याही क्षणी राजकीय निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी चे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या मनातील कोण उमेदवार हे त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे काहीच कळू शकत नाही ऐन वेळी ते धक्का तंत्राचा वापर करून सर्वांना बुचकळ्यात पाडतात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सदाशिवनगर येथील सहकारी साखर कारखान्याला महायुती सरकारने कारखाना चालवायला कर्ज हमी घेऊन सहकार्य केले आहे त्यामुळे सदर कारखाना गत गाळप हंगाम सुरळीत करु शकला आहे कदाचित या मदतीमुळे रणजितसिंह मोहिते पाटील भाजप सोडू ही शकणार नाहीत पण सध्याच्या राजकीय घडामोडींवर ते द्विधा मनःस्थितीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे