solapur

माळशिरस मध्ये दहिगाव गटाचीच चर्चा

माळशिरस तालुक्यात दहिगाव गटाचीच चर्चा

संचार वृत्त अपडेट 

सोलापूर जिल्हा परिषदेतील दहिगाव गटांमध्ये मध्ये माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांचा पराभव केला उत्तम जानकर यांनी विधानसभेला राम सातपुते ना पराभूत केले. तेव्हापासून मोहिते पाटील जानकर यांचे माळशिरसच्या राजकारणावर विशेष वर्चस्व राहिलं पण तरीही सातपुते गटाने मागे न हटता दोन्ही गटाविरोधात संघर्ष केला. माळशिरसच्या दहिगाव जिल्हा परिषद गटातून राम सातपुते यांनी पत्नी संस्कृती सातपुते यांना उमेदवारी दिली. इथेच जाकरांनी आपल्या मुलालाही उभं केलं. त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची होती. जाणकरांनी आपल्या मुलाला जीवन जाणकरला निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकत पणाला लावली होती. पण दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही सातपुते यांना विशेष ताकत दिली. आणि संस्कृती सातपुते ना निवडूनही आणलं पण या निवडणुकीत सांस्कृति सातपुते यांची प्रचाराची पद्धत जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती. प्रचारादरम्यान संस्कृती सातपुते आपल्या चार महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन गावोगावी फिरत होत्या. एका आईचा हा संघर्ष पाहून महिला वर्गाची मोठी सहानुभूती त्यांना मिळाली दहिगाव येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सभा सुरू असताना हे बाळ बराच वेळ पालकमंत्र्यांच्या मांडीवर आणि त्यानंतर वडील राम सातपुते यांच्या मांडीत खेळताना दिसलं होतं. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले होते पण यावर विरोधकांकडून टीका ही झाली. राम सातपुते यांनी जाहीर सभेतून या टीकेचा कडाडून समाचार घेतला तुमची लढत माझ्याशी आहे मग त्या निष्पाप लेकराला राजकारणात का ओढता असा भावनिक सवाल त्यांनी मतदारांसमोर उपस्थित केला होता. सातपुतेंच्या बाजूने सहानुभूती निर्माण झाली सहानुभूतीच्या या लाटेपुढे जाणकारांची विव्हरचना कोलमडली आणि संस्कृती सातपुते निवडून आल्या केवळ जिल्हा परिषदच नव्हे तर दहिगाव गटातील दोन्ही पंचायत समितीच्या जागांवरही भाजपने वर्चस्व मिळवले आणि जाणकरांच्या बालेकिल्लाला मोठा सुरुंग लावला. जानकर मोहिते पाटील गट एकत्र असूनही सातपुते यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. दहिगाव मधून विजय मिळवल्यानंतर माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील, जानकर यांना माळशिरस मधून भाजपचा सुपडा साफ करणारा  अजून जन्माला यायचा आहे अशा शब्दात त्यांनी वार केला. विधानसभेला झालेल्या पराभवाची सातपुते यांनी व्याजासकट परतफेड केल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button