कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर करण्याची मागणी

कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर करण्याची मागणी
भाजप नगरसेवक आक्रमक
संचार वृत्त अपडेट
सफाई कामगारांच्या पगाराचा प्रश्न गटनेते व भाजप नगरसेवकांनी लावून धरला
अकलूज नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत भारतीय जनता पार्टीचे गटनेते व नगरसेवक राहुल लोंढे, नगरसेविका दिपाली वाघमोडे, नगरसेविका जयश्री एकतपुरे आणि नगरसेवक महेश केशव शिंदे यांनी सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.सभेच्या निमित्ताने काही झाडूवाले व साफसफाई कामगार यांच्याशी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी कामगारांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, त्यांना मिळणारा पगार हा अत्यंत कमी असून तो ही वेळेवर मिळत नाही. यामुळे कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे.
या गंभीर बाबीची दखल घेत, राहुल लोंढे व उपस्थित भाजप नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. कामगारांना सन्मानजनक पगार आणि तो ही वेळेवर मिळाला पाहिजे, यावर त्यांनी ठाम भूमिका घेतली. कामगारांना जास्तीत जास्त सोयी कशा देता येतील आणि त्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा कसा काढता येईल, यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही न केल्यास कामगारांच्या हितासाठी तीव्र लढा उभारला जाईल, असे संकेत यावेळी देण्यात आले.



