solapur

सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

संचार वृत्त अपडेट 

समाज सुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त अकलूज नगर परिषदेतर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याची आठवण करून देण्यात आली.
कार्यक्रमाला मुख्याधिकारी सचिन पाटील, नगरसेवक राहुल लोंढे, दिपाली वाघमोडे,जयश्री एकतपुरे, सरचिटणीस अमित टिळेकर,अमोल माने विक्रांत देशमाने, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक न्याय आणि समतेसाठी केलेल्या महान कार्याचा गौरव केला. त्यांच्या विचारांमुळे समाजात शिक्षणाची ज्योत पेटली आणि महिलांना शिक्षणाचे दार खुले झाले, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी क्रांतीज्योतींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजात शिक्षण, समता आणि प्रगतीची वाटचाल सुरू ठेवण्याचा संकल्प केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button