solapur

मा.आ.राम सातपुते यांच्या चिमुकलीलाही बैलगाडा शर्यतीचे आकर्षण

मा.आ.राम सातपुते यांच्या चिमुकलीलाही बैलगाडा शर्यतीचे आकर्षण

संचार वृत्त अपडेट 

माळशिरस तालुक्यात सदाशिवनगर (पालखीतळ) येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतींचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असताना माजी आमदार राम सातपुते यांच्या आठ महिन्यांच्या चिमुकलीलाही या शर्यतीचे आकर्षण आवरले नाही. वडिलांच्या कुशीत बसून तिनेही बैलगाडा शर्यतीचा आनंद घेतला.
या वेळी मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने फेटे बांधून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात आली होती. शर्यती सुरू असताना राम सातपुते आपल्या मुलीला मांडीवर घेऊन मैदानाकडे लक्ष देऊन शर्यती पाहत असल्याचे दृश्य उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या बैलगाडा शर्यतींचा आनंद मोठ्यांबरोबरच लहान मुलांनाही तितकाच आवडतो, याचेच हे उदाहरण मानले जात आहे. उपस्थितांनीही या गोंडस क्षणाचे कौतुक केले.

देवाभाऊ बैलगाडी शर्यती उत्साहात; राम सातपुते यांचा सन्मान 


माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथे पारंपरिक बैलगाडी शर्यती उत्साहात पार पडल्या. या शर्यती राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांना परिसरातील नागरिक आणि बैलगाडी शौकिनांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमादरम्यान शर्यतींचे यशस्वी आयोजन झाल्याबद्दल राम सातपुते यांचा त्यांच्या विशेष सहकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून सत्कार केला व अभिनंदन केले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
या शर्यतींमुळे परिसरात पारंपरिक क्रीडा संस्कृतीला चालना मिळत असून ग्रामीण भागातील युवकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. कार्यक्रमाला अनेक मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button