solapur

महिला सक्षमीकरण सप्ताह उत्साहात साजरा

महिला सक्षमीकरण सप्ताह उत्साहात साजरा

संचार वृत्त अपडेट 

होता साऊ तुम्ही म्हणून आहोत आम्ही
या भावनेप्रमाणे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आमच्या साऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन महिला सक्षमीकरण सप्ताहाची सांगता म्हणून आज जि.प.शाळा मुले दोन व मुली तीन या ठिकाणी महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुकुमारी अंगुले मॅडम व सर्व शिक्षकांनी सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पूजन केले सर्व सहकारी शिक्षक बंधूं  पांडुरंग मोहिते,  दत्तात्रेय गायकवाड, श्री तय्यब शेख, श्रीकांत राऊत, समीर कोरबू सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून व आपल्या मनोगतातून सर्व महिलांचा सन्मान केला. त्याचबरोबर महिलांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करून एक आनंदाची संधी उपलब्ध करून दिली सर्व महिला शिक्षिका सुकुमारीअंगुले मॅडम मनीषा बळवंतराव मॅडम रेखा कोळी मॅडम सुरैया कोरबू मॅडम अंजली अडाणे मॅडम फातिमा मुलाणी मॅडम वर्षा राणी जाधव मॅडम हजराबी बांगी मॅडम करीना शेख मॅडम या शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि आजचा आनंद द्विगुणीत केला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता  श्रीकांत राऊत यांनी आभार मानले 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button