solapur

सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

संचार वृत्त अपडेट 

अकलूज नगरपरिषदेचे नूतन कर्तव्यदक्ष नगरसेवक,युवकांचे ह्दय सम्राट व युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुला व मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी सयाजीराजे मोहिते-पाटील उपस्थित राहून दप्तर,वह्या, पुस्तके,वाॅटरबॅग यांचे वाटप करण्यात आले.त्यामुळे या शाळेतील मुलांसाठी हा आनंदाचा क्षण बनला.यावेळी अकलूज नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रतिभा गायकवाड,अभिशेख गायकवाड,प्रियांका गायकवाड,राहुल जाधव, गणेश वाघमारे,चरण साळुंखे, अविनाश सोनवणे,गोपाल मस्तुद, संतोष बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button