solapur

प्रभाग ८ मध्ये रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी; नगरसेविका दिपाली वाघमोडे यांची गुणवत्ता तपासणी

प्रभाग ८ मध्ये रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी; नगरसेविका दिपाली वाघमोडे यांची गुणवत्ता तपासणी

संचार वृत्त अपडेट 

 प्रभाग क्रमांक ८ मध्ये सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविण्याच्या गांधी चौक येथील कामांची भाजप च्या नगरसेविका व अकलूज शहर महिला मोर्चा अध्यक्षा दिपाली वाघमोडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाचा दर्जा तपासून संबंधित ठेकेदारांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
गांधी चौक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती सुरू असून नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. नगरसेविका वाघमोडे यांनी काम टिकाऊ आणि दर्जेदार व्हावे यासाठी विशेष लक्ष दिले. खड्डे व्यवस्थित भरले जावेत, डांबर व खडीचा योग्य वापर व्हावा याबाबत त्यांनी ठेकेदारांना कडक सूचना केल्या.
यावेळी त्यांनी सांगितले की, “प्रभागातील रस्ते दुरुस्तीचे काम दर्जेदार आणि टिकाऊ  ठेकेदार कडून करून घेणे ही आपली जबाबदारी आहे. नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवास मिळावा यासाठी कामात कोणताही हलगर्जी पणा सहन केला जाणार नाही”.
स्थानिक नागरिकांनीही या कामाबद्दल समाधान व्यक्त करत लवकरच सर्व रस्ते सुरळीत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी भाजपचे सक्रिय व निष्ठावंत कार्यकर्ते संतोष वाघमोडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button