solapur

अकलूजमध्ये अनधिकृत कत्तलखान्यांविरोधात संताप; तातडीने कारवाईची मागणी

अकलूज मध्ये अनधिकृत कत्तल खान्यांविरोधात संताप; तातडीने कारवाईची मागणी

संचार वृत्त अपडेट 

अकलूज शहरातील वाढत्या अनधिकृत कत्तलखान्यांमुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या कत्तलखान्यांवर तात्काळ कारवाई करून ते उद्ध्वस्त करावेत, अशी मागणी नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या कत्तलखाने सुरू असून, तेथे कोणतेही स्वच्छता नियम किंवा आरोग्यविषयक निकष पाळले जात नाहीत. कत्तलखान्यांमधून निघणारा कचरा व रक्त थेट रस्त्यावर किंवा नाल्यात टाकले जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच, या प्रकारामुळे पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. संबंधित विभागाने तात्काळ पाहणी करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि शहरातील अनधिकृत कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नगर परिषद प्रशासनाने या निवेदनाची दखल घेत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोवंशहत्या बंदी कायदा लागू आहे. गोमातेला राज्य मातेचा दर्जा देखील दिलेला आहे. तरी देखील अकलूज शहरामध्ये दररोज शेकडोंच्या संख्येमध्ये गोवंशाची कत्तल चालू आहे. अकलूज नगरपरिषद च्या हद्दीमध्ये कसाई मोहल्ला / खाटीक गल्ली , मसूद मोहल्ला , समतानगर , लकी खानावळच्या बाजूच्या बोळात या परिसरात एकूण ७ अनधिकृत व बेकायदेशीर कत्तलखाने आहेत गोवंशाची कत्तल करुन गोमांस मुंबई , पुणे , सोलापूर , कर्नाटक या ठिकाणी आलिशान कार व टेम्पो मधून मोठ्याप्रमाणात पाठविण्याचे काम चालू आहे.तसेच अनधिकृत काही शेड्समध्ये मोठ्या प्रमाणात गोवंशाचासाठा तयार केला जातो आणि तो गोवंश बाहेर कत्तलीसाठी पाठवला जातो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कत्तलखान्याकडे नगरपरिषदेने तथडीने कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.

 नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून त्यांच्या वाढत्या तक्रारी येत आहे. आणि पर्यावरणाची सुद्धा हानी होत आहे. सामाजिक गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढलेले आहे.सर्व बेकायदेशीर कत्तलखाने व जनावरे बांधण्यासाठी तयार केलेले शेड्स तातडीने उध्वस्त करण्यात यावेत यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हा धिकारी, पोलीस अधीक्षक,अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी, उप नगराध्यक्ष शिवतेसिंह मोहिते पाटील ,  तहसीलदार,प्रांताधिकारी,अकलूज शहर पो.स्टे. यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी सकारात्मक चर्चा झाली लवकरच कायदेशीर कारवाई होईल असे आश्वासन प्रशासनाने दिले असल्याचे गोरक्षका कडून पत्रकारांना सांगण्यात आले.यावेळी गोरक्षक स्वप्नील वाघमारे,भाजपचे महादेव कावळे,स्वप्नील माने देशमुख ,प्रतीक भेगडे , शरद कोतकर , अवधूत घाटे व बहुसंख्य गोरक्षक, गोप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button