solapur

स्वामी समर्थांच्या समोर स्वामी भक्त नतमस्तक

स्वामी समर्थांच्या समोर स्वामी भक्त नतमस्तक

संचार वृत्त अपडेट 

श्री स्वामी समर्थांचे साधना स्थान असलेल्या अकलूज (गिरझणी ईलाक्षीदेवी नगर) येथील स्वामी महाराज मंदिरात आज श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त भाविक दिवसभरात स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय व अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त,सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय या अबाल वृद्धांच्या जयघोषात संपूर्ण आसमंत दुमदुमला.श्रींच्या दर्शनाकरिता स्थानिक व परगावाहून आलेल्या भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रध्देने उपस्थिती दर्शवून अपार श्रद्धेने श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत श्रींचे दर्शन घेतले.दिवसभरात पारंपारिक पद्धतीने भजन,आरती, स्वामी नावाचा जयघोष व महाप्रसाद संपन्न होऊन भक्तांनी याचा लाभ घेतला.भक्ती भावाच्या स्वरात मंदिर परिसर दुमदुमला होता.

यावेळी धनंजय गाडेकर,अविनाश चव्हाण,रामेश्वर कदम, संदीप गोसावी,संतोष यादव,पाटील दाजी, राजू साठे,प्रदीप कनाळ,आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button