अकलूज मध्ये जादा परताव्याचे आमिष सात लाख ४४ हजारांची केली फसवणूक

अकलूज मध्ये जादा परताव्याचे आमिष सात लाख ४४ हजारांची केली फसवणूक
संचार वृत्त अपडेट
गुंतवणुकीवर दरमहा २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ७ लाख ४४ हजार १५५ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार अकलूजम ध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात पनवेल येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहितीनुसार, जगदीश सुभाष खोचरे (वय ३८, रा. | स्वरूपनगर, अकलूज, ता. माळशिरस)यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची ऑगस्ट २०२४ ते मे २०२५ या कालावधीत ही फसवणूक झाली. आरोपी भास्कर हंसराज साळुंखे (वय ३६, रा. इंडिया बुल्स, १०/जी, १७०५ प्लारपा, कोणगाव, ता. पनवेल, जि. रायगड) याने फिर्यादीची भेट घेऊन ‘दि वर्ल्ड माईन’ नावाच्या प्लिकेशनवर पैसे गुंतवण्यास सांगितले. गुंतवणूक केलेल्या रकमेवर दरमहा २० टक्के नफा मिळेल, असा विश्वास आरोपीने फिर्यादीला दिला होता. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने एकूण ८,००,००० रुपये गुंतवले होते. त्यापैकी सुरुवातीला ५५,८४५ रुपये फिर्यादीला परत मिळाले. मात्र, उर्वरित ७,४४,१५५ रुपये आरोपीने स्वतः च्या फायद्यासाठी वापरून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.या प्रकरणी अकलूज पोलिसांनी आरोपी भास्कर साळुंखे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (इछड) कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पो-लीस उपनिरीक्षक (मपोउपनि) वणवे करत आहेत.



