solapur

गणेश मंदिरात परशुराम जयंती साजरी ; ब्राह्मण समाज बांधवांचा सहभाग

गणेश मंदिरात परशुराम जयंती साजरी ; ब्राह्मण समाज बांधवांचा सहभाग

शस्त्र व शास्त्राचे प्रतीक भगवान परशुराम

संचार वृत्त अपडेट

आराध्य दैवत भगवान श्री परशुराम यांची जयंती सालाबादप्रमाणे ब्राह्मण सेवा संघ व गणपती मंदिर ट्रस्ट अकलूज यांच्या वतीने पेशवे कालीन गणेश मंदिर येथे संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व माजी अध्यक्ष श्याम भागवत यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली.गणेश मंदिराच्या प्रांगणात भगवान परशुराम जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम भक्तिभावाने साजरा करण्यात आला.विष्णूचा सहावा अवतार व चिरंजीव मानले जाणारे भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी स्थानिक ब्राह्मण समाज बांधव व परिसरातील भाविक,नागरिक  उपस्थित होते. भगवान परशुरामांच्या शौर्य, त्याग व धर्मरक्षणाच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.उपाध्यक्ष हरी कुलकर्णी, सचिव निरंजन डांगे, सहसचिव डॉक्टर प्रेमनाथ रामदासी,जयेश कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, निलेश कुलकर्णी, राहुल भागवत, महेंद्र जोशी आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa