solapur

माळशिरसच्या विकासासाठी राम सातपुते सरसावले ; विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी

माळशिरसच्या विकासासाठी राम सातपुते सरसावले ; विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी

संचार वृत्त अपडेट 

माळशिरस तालुक्यातील रखडलेल्या व प्रस्तावित विकासकामांना गती देण्यासाठी माजी आमदार राम सातपुते यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी तालुक्यातील विविध विकासकामांसाठी भरीव निधीची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदनावर स्वाक्षरी करून तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिल्याचे समजते.

——————————————–

‘तालुक्याच्या विकासाला प्राधान्य’

 “माळशिरस तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, शिक्षण व आरोग्य सुविधांसंबंधी अनेक कामे निधीअभावी रखडली आहेत. ग्रामीण जनतेच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भरीव निधीची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच निधी उपलब्ध होईल, असा विश्वास आहे.”

राम सातपुते

(माजी आमदार व भाजप युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष)

——————————————

या वेळी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.  सातपुते यांनी सातत्याने माळशिरसच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरू ठेवल्याने तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे माळशिरसच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा नागरिकातून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa