
काळ आला झाडाच्या रूपाने झाड कोसळून जखमी
धोकादायक झाडे हटवण्याची मागणी
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथील तलाठी कार्यालयाजवळ दुर्घटना घडली जुने, महाकाय लिंबाचे झाड अचानक मुळासकट उन्मळून रस्त्यावर कोसळले. यावेळी रस्त्याने जाणारे मारुती भोसले यांच्या अंगावर झाड पडल्याने ते जखमी झाले आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सदर लिंबाचे झाड अनेक वर्षे जुने व आतून पोखरलेले होते. आधी झाडाला आग लागण्याचे निदर्शनास येताच सक्रिय नगरसेवक राहुल लोंढे व महेश शिंदे यांना समजताच तात्काळ नगर परिषदेशी संपर्क साधून झाडाला लागलेली आग विझवली. कोणताही वारा-पाऊस नसताना अचानक ते कोसळले. दुर्दैवाने त्याचवेळी तेथून जाणारे मारुती भोसले हे झाडाखाली सापडले. झाडाचा मोठा भाग त्यांच्या डोक्यावर व पाठीवर आदळल्याने त्यांना मार लागला आहे.
“शहरात अशी अनेक धोकादायक, जीर्ण झाडे आहेत. नगरपरिषदेने यांचे वेळीच ऑडिट करून धोकादायक झाडे हटवली असती तर आज ही वेळ आली नसती.
शहरातील सर्व जुनी, धोकादायक व जीर्ण झाडांचे तातडीने सर्वेक्षण करावे.नागरिकांच्या जीवाला धोका असलेली झाडे तात्काळ हटवण्याची मोहीम हाती घ्यावी व या घटनेची मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी डॉ.अक्षय वाईकर यांनी केले आहे.
मारुती भोसले यांच्या जोशी गल्ली येथे त्यांचे घरी जाऊन त्यांच्या तब्बेतिची विचारपूस केली. त्यांना डॉक्टरांनी काही दिवस बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी भाजप नेते डॉ.अक्षय वाईकर, नगरसेवक महेश शिंदे,राहुल लोंढे आदी उपस्थित होते.



