मुख्याधिकारी सचिन पाटील स्वतः मैदानात पी आय नीरज उबाळे यांच्या फौज फाट्यासह अवैध कत्तलखाने जमीन दोस्त पुढचा नंबर रोड वडील अतिक्रमणाचा ?

मुख्याधिकारी सचिन पाटील स्वतः मैदानात
पी आय नीरज उबाळे यांच्या फौज फाट्यासह अवैध कत्तलखाने जमीन दोस्त
पुढचा नंबर रोड वडील अतिक्रमणाचा ?
संचार वृत्त अपडेट
अकलूज नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी ‘सिंघम स्टाईल’ धडक कारवाई करत संपूर्ण शहर हादरवून सोडले. शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ९ अवैध कत्तलखान्यांवर स्वतः JCp वरती बसून कारवाई करत त्यांनी सज्जड दणका दिला.गेल्या अनेक दिवसांपासून अकलूज शहर व परिसरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या पथकासह धडक मोहीम हाती घेतली.पाटील यांनी थेट JCB मशीन मागवली आणि स्वतः ड्रायव्हर शेजारी बसून कत्तलखान्यांच्या दिशेने कूच केले. PI नीरज उबाळे यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवत कोणालाही मध्ये येऊ दिले नाही.
या धडक कारवाईत शहरातील विविध भागातील ९ अवैध कत्तलखाने पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले.नगरपरिषद व पोलीस प्रशासन संयुक्तपणे काम करत आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. या अवैध कत्तलखान्यांमुळे दुर्गंधी, रोगराई पसरत होती. नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.अतिशय संवेदनशील भागामध्ये असणारे हे कत्तलखाने उध्वस्त करताना अकलूज पोलिसांनी महत्वाची कामगिरी बजावली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे,पोलीस निरीक्षक नीरज उबाळे व अनेक पोलीस कर्मचारी या कारवाईमध्ये सामील झाले होते.
महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार व पशुकल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन व विभागीय दांडाधिकारी माळशिरस यांच्या आदेशान्वये शहरातील रमामाता कॉलोनी,समतानगर, अकलाई कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व अतिक्रमणाच्या आडून गोवंशाचे कत्तलखाने जोमाने सुरु होते.यावेळी नगरपरिषदेचे बांधकाम विभागाचे धोंडीराम भगणूरे,कार्यालयीन अधीक्षक सुनील काशीद,आरोग्य विभागाचे महिबूब शेख,विद्युत विभागाचे बाळासाहेब कांबळे,अतिक्रमण, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कत्तलखाना चालकांनी आपली बांधकामे, पत्राशेड पडली जाऊ नयेत म्हणून मोठा विरोध केला.परंतु अकलूज पोलिसांनी हा विरोध मोडून काढत कत्तलखाने उध्वस्त केले.ही बांधकामे पाडण्यापूर्वी सदर लोकांना नगरपरिषदेने नोटीस काढून सूचना दिली होती.
अकलूजच्या दोन अधिका-यांची धडाकेबाज कामगिरी.
अकलूज ग्रामपंचायत अस्तित्वात असताना अशीच कामगिरी धडाडीचे कार्य करणारे सोलापूरचे तात्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी अकलूज येथील गांधी चौक ते कर्मवीर चौकापर्यंतचे सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते.हे प्रशासकीय काम अकलूज पोलीस स्टेशनला दिले होते. त्यावेळेसचे अकलूज पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक विश्वास साळुंखे यांनी धडाकेबाज कारवाई करत एका दिवसात अकलूजमधील सर्व अतिक्रमण काढली होती.त्यानंतर काल अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी स्वत: जेसीपीमध्ये बसून सिंघम कारवाई करत सर्व अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करत कारवाई केली त्यामुळे या दोन अधिका-यांचे कार्य अकलूजकर कधीच विसरणार नाहीत.जे गावाला जमले नाही ते या दोन अधिका-यांनी करून दाखविले आहे.
मुख्य रस्त्यावर कधी ? ट्रॅफिक जामने जनता त्रस्त
कत्तलखाने संपवले, आता रस्ते मोकळे करा! ‘सिंघम’ सचिन पाटील यांचा बुलडोझर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर धडकणार? ट्रॅफिक जामने वैतागलेल्या अकलूजकरांचा सवाल, ‘एकच वादा – अतिक्रमण हटवा'” असा सूर जनतेतून निघत आहे आता नागरिकांची नजर मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमणांकडे लागली आहे. “कत्तलखान्यांचा कोथळा काढला, तसाच रस्ते अडवणाऱ्या अतिक्रमणांचा काढा,” अशी मागणी जनतेतून होत आहे.कालच्या धडाकेबाज कारवाईनंतर सोशल मीडिया व चौकाचौकात एकच चर्चा आहे – “साहेबांनी हिंमत दाखवली, आता रस्ते मोकळे करून दाखवावे.अकलूज मधील मुख्य रस्त्यांवर व मुख्य चौकात टपऱ्या, हातगाडे, दुकानांचे बेकायदेशीर शेड व पायऱ्यांमुळे वाहतुकीचा प्रचंड बोजवारा उडाला आहे. रुग्णवाहिकेलाही वाट मिळत नाही. शाळकरी मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते.
कत्तलखान्यांवर कारवाई केली तशीच धडाडी मुख्य रस्त्यावर दाखवा. फक्त नोटीस नको, डायरेक्ट JCB लावा.असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.मुख्य रस्त्यावरीलअतिक्रमणामुळे ग्राहक येत नाहीत. रस्ता मोठा दिसेल, अपघात कमी होतील. सचिन पाटील साहेबांनी धाडस केले तर आम्ही स्वतःहून अतिक्रमण काढू.असा सूर व्यापारी वर्गातून निघत आहे मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण विभागाला मुख्य रस्त्यांचा सर्व्हे करण्याचे आदेश द्यावेत”कत्तलखाने हा पहिला टप्पा होता. ‘ऑपरेशन क्लीन अकलूज’ अंतर्गत शहरातील सर्व अवैध बांधकामे, अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटवली जावीत अशी मागणी होत आहे तर नागरिकांनी सहकार्य करावे,” असे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत. मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे चिन्हांकित करावीत.कत्तलखान्यांप्रमाणे थेट JCB लावून कारवाई करावी.कायमस्वरूपी तोडगा काढावा एकदा हटवल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी भरारी पथक नेमावे.अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.तर रस्ते मोकळे करणार का? याकडे अकलूजकरांचे लक्ष लागले आहे .



