राम सातपुते यांचा आनंदनगरला तातडीचा दौरा नुकसानग्रस्त सोबत बैठक

राम सातपुते यांचा आनंदनगरला तातडीचा दौरा नुकसानग्रस्त सोबत बैठक
संचार वृत्त अपडेट
आनंदनगर (ता.माळशिरस) येथे झालेल्या वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे आनंदनगर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे, घरांच्या छपरांचे आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उभी पिके जमीनदोस्त झाली असून नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत.या पार्श्वभूमीवर आमदार रामभाऊ सातपुते यांनी आज वादळग्रस्त आनंदनगरला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी नागरिक,शेतकरी, कार्यकर्त्यांसोबत तातडीची बैठक घेतली.

नागरिकांनी त्यांच्यासमोर झालेल्या नुकसानीची व्यथा मांडली.यावेळी बोलताना सातपुते म्हणाले निसर्गाच्या या तडाख्याने आनंदनगरचे शेतकरी आणि कुटुंबं मोठ्या संकटात सापडले आहेत. शासनाने विलंब न करता तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त प्रत्येक कुटुंबाला मदत द्यावी, यासाठी मी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार आहे. कोणीही आधाराशिवाय राहणार नाही.त्यांनी प्रशासनाला उद्यापासूनच पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली असून, वीजपुरवठा पूर्ववत करणे, पडलेल्या झाडांची तातडीने विल्हेवाट लावणे आणि घरांचे नुकसान झालेल्यांना तात्पुरती निवारा व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.वादळानंतर आमदारांचा हा धडक दौरा आणि तातडीचा प्रतिसाद पाहून आनंदनगरच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी सातपुते यांनी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून येथील द्वारकाधीश निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. द्वारकाधीश परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार सातपुते यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक व विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली.या प्रसंगी युवा नेते जयराज माने पाटील (सदस्य, भाजपा सोलापूर), विठ्ठल शाम वसंतराव गायकवाड (मा. उपसरपंच, आनंदनगर), गौतमतात्या शेळमकर (मा. चेअरमन, दूध डेअरी आनंदनगर), विठ्ठल शेळमकर (मा.सरपंच आनंदनगर),गंगाधर चव्हाण,नानासाहेब काटकर (सदस्य, भाजपा युवा मोर्चा माळशिरस), पोपटराव चव्हाण (मा. उपसरपंच, आनंदनगर), डॉ. अक्षयजी वाईकर (सदस्य, भाजपा युवा मोर्चा सोलापूर), नामदेवराव गायकवाड (सदस्य, भाजपा माळशिरस), समाधान शेळमकर (सदस्य, भाजपा युवा मोर्चा माळशिरस), सागरभैया शेळमकर, ऋषिकेश गायकवाड (बूथ प्रमुख, भाजपा आनंदनगर), चांगदेव भांगे, अशोक शेळमकर , माऊली पानसरे ,माऊली जगताप ,संजय शिंदे , साहेबराव दांगट , विक्रम जाधव ,पै.चव्हाण (सदस्य भाजपा,माळशिरस)डॉ. हर्षवर्धन गायकवाड (उपाध्यक्ष, निमा माळशिरस तालुका), ऋतुराज गायकवाड तसेच गायकवाड परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाळकृष्ण गायकवाड, माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.



