solapur

आ.उत्तमराव जानकर यांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे वाघे यांची शिफारस.

आ.उत्तमराव जानकर यांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे वाघे यांची शिफारस.

संचार वृत्त अपडेट (९४०५७०३९९०)

संजय लोहकरे

माळशिरस मतदारसंघातील शासकीय रुग्णालयांमध्ये प्रभावी लोक सहभाग वाढवून रुग्णांना अधिक दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माळशिरस तालुक्याचे आ.उत्तमर जानकर यांनी पुढाकार घेतला असून माळशिरस तालुक्यातील अकलूज उपजिल्हा रुग्णालय,माळशिरस ग्रामीण रुग्णालय व नातेपुते ग्रामीण रुग्णालय येथील “रुग्ण कल्याण समिती”वर स्थानिक प्रतिनिधींची नियुक्ती करून त्यांना मान्यता देण्याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक,सोलापूर यांना दिले आहे 
शासकीय रुग्णालयांचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा आणि सामान्य रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक लोक प्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व धनगर समाजाचे धडाडीचे नेते लक्ष्मीकांत वाघे यांची आ.उत्तमराव जानकर यांनी शिफारस  केल्याने  माळशिरस तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवातून स्वागत होत आहे. 
त्याच्या बरोबर शिफारस करण्यात आलेले   सदस्य  साजिदभाई इब्राहिम सय्यद,माळशिरस ग्रामीण रुग्णालय मारुती देशमुख,नातेपुते ग्रामीण रुग्णालय संदीप चंद्रकांत ठोंबरे हे आहेत. ग्रामीण भागातील रुग्णालयांच्या व्यवस्थापनात सुधारणा होऊन सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणे अधिक सुलभ होईल.असा विश्वास आ.उत्तमराव जानकर यांनी व्यक्त केला.त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्राद्वारे तातडीने पुढील प्रशासकीय कार्यवाही करून या नियुक्त्यांना मान्यता देण्याची विनंती केली आहे. तालुक्यातून सर्वच स्तरातून कौतुक होत असून,आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असणार असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त सदस्यांनी दिली आहे.

वाघे यांनी सन २०१४ धनगर आरक्षण आंदोलनातून समाजाच्या हितासाठी सक्रिय सहभाग घेतला होता,पश्चिम महाराष्ट्र स्कूल बस संघटना अध्यक्ष,अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, मल्हार सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष,या संघटनेच्या माध्यमातून ते काम करत आहेत अकलूज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळा स्थापन करण्यासाठी सतत पाठपुरावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक कमेटीचे अध्यक्ष माढा लोकसभेचे कर्तव्यदक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले आहे गेली पाच वर्षे अकलूज शहरात अत्यंत भव्य दिव्य पारंपारिक पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button