अकलूज मध्ये भाजप आणि वृंदावन फाउंडेशन ची मोफत वैद्यकीय सेवा व औषध वाटप

अकलूज मध्ये भाजप आणि वृंदावन फाउंडेशन ची मोफत वैद्यकीय सेवा व औषध वाटप
पालखी सोहळ्यात सामाजिक बांधिलकीचे दर्शन
संचार वृत्त अपडेट
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे अकलूज येथे आगमन झाल्यानंतर, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पालखीचा मुक्काम रंगला. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि वृंदावन फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज येथे वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पंढरीच्या वाटेवर अहोरात्र पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना वैद्यकीय उपचारांची मोठी गरज असते. हे लक्षात घेऊन प्रथमोपचार, पेनकिलर्स, मलम, आणि नेहमीच्या आजारांवरील औषधोपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले आपत्कालीन परिस्थितीसाठी सुसज्ज रुग्णवाहिका देखील घटनास्थळी तैनात करण्यात आली होत.थकवा, पायदुखी, रक्तदाब आणि इतर किरकोळ आजारांवर डॉक्टरांच्या टीमद्वारे तत्काळ उपचार करण्यात आले.
या वैद्यकीय शिबिराच्या ठिकाणी भाजपचे स्थानिक पदाधिकारी अमरसिंह देशमुख, वृंदावन फाउंडेशनचे नवनाथ बोडके, डॉ. विकास शिंदे, गोपालक अमर जाधव, वीरसिंह देशमुख, शिवतेजसिंह देशमुख, वरूनराजे देशमुख, नगरसेवक महेश शिंदे, दिपाली देशमुख,पत्रकार रणजित गायकवाड,शाहबाझ काझी, सचिन राठोड,राजकुमार कुलकर्णी,शशील गांधी सीए, रवींद्र चंकेश्वर, महावीर भालेराव, हरिभाऊ स्वामी,संतोष टकले,आदेश गोवे,
आदी कार्यकर्ते आणि वृंदावन फाउंडेशनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून वारकऱ्यांची सेवा करत आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले.
“वारकरी सेवा हीच खरी ईश्वर सेवा”हा ध्यास मनात ठेवून भाजप व वृंदावन फाउंडेशनने सामाजिक बांधिलकीतून आयोजित केलेल्या या उपक्रमाचे अकलूजकर ग्रामस्थ आणि वारकरी बांधवांकडून उत्स्फूर्त स्वागत व कौतुक करण्यात आले.



