solapur

पर्जन्यवृष्टी व्हावी म्हणून अकलूज येथील मदरसा बज्मे अन्वारे सोफिया च्या प्रांगणावर नमाज पठण

 पर्जन्यवृष्टी व्हावी म्हणून अकलूज येथील मदरसा बज्मे अन्वारे सोफिया च्या प्रांगणावर नमाज पठण

संचार वृत्त अपडेट 

महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता अनेक जिल्ह्यात हल्ली पावसा आभावी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून सोयाबीन व इतर खरीप पिके वाया जात आहेत हाता तोंडाला आलेला घास पावसाअभावी हिरावून जाण्याच्या मार्गावर असून गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी शेतमजूर व्यापारी हवालदिन झाला असून जीवन चक्र थांबले आहे मुक्या जनावरांच्या चारा, पाणी याचा प्रश्न निर्माण झाला आहे माणसाकडे पाहून नाही तर किमान मुक्या जनावराकडे तरी पाहून ईश्वराने पाऊस पाडावा अशा भाबड्या आशेवर नागरिक आहेत.
त्याच अनुषंगाने पर्जन्यवृष्टी व्हावी म्हणून अकलूज येथे माळीनगर रोड येथील मदरसा बज्मे अन्वारे सोफिया येथे गुरुवार दि.१० /९/२६ रोजी सकाळी ११/३० वाजता मुस्लिम समाजाच्या वतीने सामुदायिक नमाज पठण करून ईश्वराला ( अल्लाह ) नमाज द्वारे( दुवा) प्रार्थना करण्यात आली आहे पर्जन्यवृष्टी व्हावी मानवी जगजीवन व्यवस्थित व्हावे म्हणून मौलाना नियाज अहमद अल्वी यांनी नमाज पठण केली तर मौलाना अब्दुल वाहिद, हाफिज व कारी रफिक साहब, मौलाना अली साहब, मुफ्ती गुलाम हुसेन, मौलाना गुलाम सरवर, इत्यादी अलीम हाफिज यांनी ईश्वरचरणी दुवा केली. याप्रसंगी मदरसा बज्मे अन्वारे सोफिया चे ट्रस्टी दादाभाई मोहोळकर तसेच भैय्या वाडेकर, इब्राहिम बागवान सर,शब्बीर गफूर शेख, इब्राहिम मुलांणी, हाजी महमूद काझी, अल्लाबक्ष मिस्त्री, इनुस मुलाणी लतीफ भाई पटेल,, हाजी इमरान मोहोळकर, मदरसा बज्मे अनवारे सोफिया मधील विद्यार्थी व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button