solapur

तीन लाखांच्या मदतीतून निराधारांच्या आयुष्यात दिवाळीचा प्रकाश! श्री सम्मती सेवा दलाचा अनोखा उपक्रम

तीन लाखांच्या मदतीतून निराधारांच्या आयुष्यात दिवाळीचा प्रकाश!
श्री सम्मती सेवा दलाचा अनोखा उपक्रम

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर) 

 येथील पालवी संस्थेतील निराधार बालके व महिलांची दिवाळी आनंददायी व्हावी, या उद्देशाने श्री सम्मती सेवा दलाच्या वतीने तब्बल ३ लाख रुपयांचे किराणा साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे दान करण्यात आले.मागील तीन वर्षांपासून पालवी प्रकल्पातील निराधार बालके व महिलांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे गरजूंच्या जीवनात आनंद निर्माण करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श निर्माण झाला आहे.
यावेळी मिहीर गांधी यांनी पालवी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत, निराधार बालकांना चांगले शिक्षण, संस्कार आणि स्वावलंबनाची संधी मिळावी, हीच या मदतीमागील भावना असल्याचे सांगितले. संस्थेच्या संचालिका मंगला शहा यांनी सर्व दानशूरांचे आभार मानले.या उपक्रमातून दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजूंच्या आयुष्यातही आनंदाची पणती पेटविण्याचा सामाजिक संदेश देण्यात आला.यावेळी श्री सम्मती सेवा दलाचे विद्यमान अध्यक्ष तेजस गांधी, मिहीर गांधी, योगेश गांधी, संदीप शहा, आर. के. दोशी, प्रज्योत गांधी, रोहित चंकेश्वर, योगराज गांधी, रत्नकुमार फडे, नमन गांधी, महावीर भालेराव, बाहुबली पुरवत, किरण पुरवत आदी मान्यवर उपस्थित होते. पालवी संस्थेच्या संचालिका मंगला शहा यांनी मिहीर गांधी यांच्यासह सर्व दानशूरांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button