अकलूजच्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत

अकलूजच्या कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ.
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
अकलूज येथील काॅलेज ऑफ फार्मसीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ मध्ये प्रथम वर्ष बी.फार्मसी व थेट द्वितीय वर्षात बी.फार्मसी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे सभापती विनोद कुमार दोशी होते.प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक नारायण फुले, रामभाऊ गायकवाड,सचिव अभिजीत रणवरे,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री नानासाहेब देवडकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे यांनी केले.उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष बी.फार्मसी व द्वितीय वर्ष बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे यांनी मनोगत व्यक्त करताना नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने स्वागत केले.यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने राबवत असलेल्या विद्यार्थ्यांच्या धोरणांची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
या स्वागत समारंभाचे आयोजन महाविद्यालयातील द्वितीय तृतीय व अंतिम वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांनी केले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अंतिम वर्ष वर्गातील विद्यार्थी श्रीप्रसाद कुलकर्णी व कु.प्रियांका कुलकर्णी यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.