उमंग लोकसंचलित साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
बोरगांव येथील उमंग लोकसंचलित साधन केंद्राची ७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.
अकलूज दि.२३ (प्रतिनिधी)
महिला आर्थिक विकास महामंडळ (सोलापूर) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत तालुका अभियान कक्ष माळशिरस स्थापित उमंग लोकसंचलित साधन केंद्रा बोरगाव या संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीत पार पडली
या सभेसाठी सहा. जिल्हा समन्वय अधिकारी मावीम सोलापूरचे सतीश भारती, माळशिरस तालुका कार्यक्रम व्यवस्थापक रणजीत शेंडे, तरंगफळ गावाचे तृतीय पंथी सरपंच माऊली कांबळे आणि तसेच तालुका उपजीविका सल्लगार आधिकरी उमेश जाधव, शाखाधिकारी बँक ऑफ इंडिया शाखा माळेवाडी अकलूजचे,खोटे साहेब,शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र अविनाश लामतुरे, विरकर साहेब एचडीएफसी बॅंके पंढरपूर तसेच सरपंच विजयकुमार देशमुख,बोडले तसेच विविध गावातील महिला सरपंच तसेच उमंग लोकसंचालित साधन केंद्रच्या अध्यक्षा,सर्व कार्यकारणी,बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या सभेची सुरुवात व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व प्रार्थनेने झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी शेंडगे व्यवस्थापक यांनी केले त्यानंतर अहवाल अंकाचे प्रकाशन सोहळा पार पडला.अहवाल वाचन लेखापाल शैलेजा पोतदार यांनी केले. त्यानंतर तृतिय पंथी दुर्गामाता गटांच्या सचिव सूरज कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.त्यानंतर मार्गदर्शन भाषणे झाली.यामध्ये बँक ऑफ इंडिया बँकेचे शाखाधिकारी अविनाश लमतुरे यांनी विविध कर्ज योजना,वैयक्तिक कर्जाच्या योजना,शैक्षणिक कर्ज सुविधा याविषयी सविस्तर माहिती उपस्थित महिलांना दिली तसेच उमेश जाधव यांनी एमएलपी अर्धलिनशेळी,विविध व्यवसाय योजना या विषय माहिती दिली. तसेच तृतीय पंथी माऊली कांबळे मार्गदर्शनमध्ये म्हणाल्या की, उमंग लोकसंचलित साधन केंद्र अंतर्गत दुर्गामाता गटामध्ये आमच्या सारख्यांना घेऊन समाजाच्या प्रवाहात आणल्याबद्दल कौतुक केले. त्याच प्रमाणे रणजीत शेंडे यांनी एमएसआरएलएम च्या विविध योजना,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम,पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम याविषयी माहिती दिली.सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश भारती यांनी महिला बचत गटामध्ये महिलांचा सहभाग वाढविणे.महिलांच्या त्रिस्तरीय संस्था बांधणी प्रभाग संघ ग्राम संघ विषयी माहिती दिली बचत गटांचे व्याजदर समान करणे याविषयी माहिती दिली व उमंग लोकसंचालित साधन केंद्राच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.त्यानंतर उत्कृष्ट गट आणि उत्कृष्ट सीआरपी यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषक देणे,देण्यात आली तसेच बोडले येतील यूपीएससी मधून मंत्रालय येथे लिपिक पदावर रुक्मिणी जाधव निवड झाली यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी शबिरा पठाण यांचे अध्यक्षीय भाषण झाले व आभार प्रदर्शननंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली बिले यांनी मानले.
हि सभा घेण्यासाठी उमंग लोक संचलित साधन केंद्राच्या सर्व क्षेत्र अधिकारी,लेखापाल, ग्रामसंग,लेखापाल,सीआरपी सर्व कार्यकारणी व महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाचे मार्गदर्शन यांच्या सहकार्याने पार पडली.