solapur

महिला बचत गटात तृतीय पंथीयाला सामावून घेऊन केली सचिवपदी निवड

महिला बचत गटात तृतीय पंथीयाला सामावून घेऊन केले महिला बचत गटाचे सचिवपदी निवड.

खंडाळीच्या दुर्गामाता बचत गटाचा स्तुत्य उपक्रम.

अकलूज – (केदार लोहकरे)
सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व समाजातील महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या योजना शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत परंतु समाजाच्या दृष्टीने अतिशय दुर्लक्षित असलेला तृतीयपंथी समाज आजही सर्वच योजनांमधून बाजूला फेकला गेलेला आहे.त्यांना ना समाजातील पुरुष सामावून घेतात ना महिला आपल्या उपक्रमांमध्ये त्यांना स्थान देतात.
आज महाराष्ट्रातील शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली विद्यार्थ्यांसाठी योजना राबविण्यात येत आहेत वेगवेगळ्या योजनांचा लाभ सर्व समाजाला मिळत आहे परंतु आम्हा तृतीय पंथीयांसाठी मात्र कुठलीही योजना नाही.ना आम्हाला या सामाजिक उपक्रमात कोणी सामावून घेत आहेत.त्यामुळे आम्ही माणूस आहोत ही भावनाच शासन आणि समाज यांच्या नामा निराळे आहे. शासन आणि समाज दोघांनीही आम्हा तृतीयपंथीयांना दुर्लक्षित केले आहे त्यामुळे आम्ही समाजाचं काय नुकसान केलं आहे.देवानेच आम्हाला वेगळं निर्माण केलं त्यामुळे निदान माणसांनी माणूस म्हणून तरी आम्हाला सामावून घ्यावे व सन्मानाची वागणूक द्यावी अशी भावना माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावचे सरपंच तृतीयपंथी माऊली कांबळे यांनी बोलून दाखविली.खरे तर महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण,लाडका भाऊ योजना काढून त्यांना भरघोस आर्थिक मदत मिळणार आहे.पण आमच्या सारख्या तृतीय पंथीयांसाठी कोणतीच योजना नसल्याची खंत हि त्यांनी व्यक्त केली.आमच्याकडे आधार कार्ड आहे,रेशनकार्ड आहे तसेच आम्हाला सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदानाचा पण अधिकार आहे.पण आमचा विचार कोणच करत नाही आहे. आमच्या बाबतीत शासनाची संकोच वृत्ती का ? असा सवाल हि त्यांनी केला.महाराष्ट्र सरकारने तृतीय पंथीयांना समाज प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित उमंग लोकसंचलित साधन केंद्र बोरगांव अंतर्गत माळशिरस बचत गटाच्या माध्यमातून खंडाळी येथील दुर्गामाता महिला बचत गटात तृतीय पंथी सुरज कांबळे याची सचिवपदी नियुक्ती करण्यात आले आहे.त्यामुळे आमच्या सारख्याच्या उज्वल भविष्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अशाच प्रकारे जिल्ह्यातील सर्व बचत गटात तृतीय पंथीयांना स्थान देऊन त्यांचे हि भवितव्य उज्वल करावे.अशी आशा व्यक्त केली.या उपक्रमसाठी सहा. जिल्हा समन्वय अधिकारी सतिश भारती,माळशिरस तालुका कार्यक्रम अधिकारी रणजीत शेंडे, उमंग लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक शिवाजी शेंडगे, अध्यक्षा शबिरा शेख व सर्व महिला स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले.

(माळशिरस तालुका नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात मार्गदर्शक राहिला आहे.त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे माळशिरस तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा सरपंच माझ्यासारख्या एका तृतीय पंथीयला केलं आणि आता याच पद्धतीने माळशिरस तालुक्यातील खंडाळी गावात दुर्गामाता महिला बचत गटात आमचाच एक तृतीयपंथी सहकारी सुरज कांबळे यांना या बचत गटातील सर्व महिलांनी बचत गटाच्या सदस्यांनी सामावून घेऊन बचत गटाच्या सचिवपदाची जबाबदारी दिली.ती जबाबदारी नक्कीच तो यशस्वीपणे पार पाडेल व महाराष्ट्रातील सर्वच समाजाला एक वेगळा आदर्श निर्माण करेल.)
माऊली कांबळे,
सरपंच ग्रामपंचायत तरंगफळ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button