solapur

प्रा.धनंजय देशमुख यांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड

प्रा.धनंजय देशमुख यांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड

संचार वृत्त अपडेट 

 अकलूज येथील प्रा.धनंजय शामराव देशमुख यांची नांदेड येथे होणा-या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, शिक्षक यांच्यामध्ये शैक्षणिक, प्रशासकीय कौशल्य वाढण्याबरोबरच समन्वय सहकार्य आणि स्पर्धात्मकतेची भावना निर्माण होऊन त्या सर्व गुणांचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवले जावेत,विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक भावनिक विकास व्हावा या उद्देशाने प्रथमच या वर्षापासून महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे ३०यांच्यावतीने योगासन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत प्रा. देशमुख यांनी घवघवीत यश संपादन करून त्यांची नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रा.देशमुख हे शिक्षण प्रसारक मंडळाच्या महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाकडे कार्यरत आहेत. ते सदगुरु श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगशिक्षक असून त्यांनी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर संचलित योग महाविद्यालय शिरपूर जि.धुळे येथून एम ए योगशास्त्र ही पदवी संपादन केली आहे . तसेच भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे ते मान्यता प्राप्त योगा ट्रेनर असून त्यांनी गांधी स्मारक प्राकृतिक चिकित्सा समिती (रजि.)नवी दिल्ली यांची निसर्गोपचार तज्ञ ही पदवी संपादन केली आहे.
युवक मित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून ते व्यसनमुक्तीचे कार्य करतात त्याचबरोबर आम्ही अकलूजकर या समूहाच्या माध्यमातून अनाथ,अपंग, निराधार व गोरगरिबांसाठी कार्य करतात.
प्रा. देशमुख यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरुपाराणी मोहिते पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक शिवतेसिंह मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील, सभापती नितीन खराडे पाटील, सदस्य अनिल जाधव,मुख्याध्यापक संजय गळीतकर तसेच सर्व शिक्षक, आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक, व्यसनमुक्त युवक संघाचे सदस्य आम्ही अकलूजकर समूहाचे सदस्य यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button