solapur

शेतकऱ्यांच्या  हक्कांसाठी लवंगमध्ये भव्य शेतकरी मेळावा!

शेतकऱ्यांच्या  हक्कांसाठी लवंगमध्ये भव्य शेतकरी मेळावा!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार; शेतकरी बांधवांना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर) 

 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माळशिरस तालुक्यातील लवंग येथे भव्य ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या लढाईत सहभागी व्हावे आणि आपल्या मागण्यांसाठी एकजुटीने उभे राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना, माळशिरस तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.ऊस उत्पादनासाठी वाढता खर्च, शेतीसमोरील विविध आव्हाने आणि ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविण्याच्या दृष्टीने या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना बळ देण्यासाठी आणि शेतकरी चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी या मेळाव्यात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.स्थळ : लवंग, २५/४
दिनांक : १९ ऑक्टोबर २०२६
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
आयोजक : स्वाभिमानी शेतकरी संघटना, माळशिरस तालुका,शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच्या या लढ्यात प्रत्येक शेतकऱ्याचा सहभाग महत्त्वाचा असून, आपल्या न्याय्य हक्कांसाठी सर्व शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button