solapur

दुर्गामाता महादौडीचा महासंगम! पावनखिंडच्या जिवंत देखाव्याने भारावले अकलूजकर; लहान मुलांसह हजारो धारकरी सहभागी

दुर्गामाता महादौडीचा महासंगम! पावनखिंडच्या जिवंत देखाव्याने भारावले अकलूजकर; लहान मुलांसह हजारो धारकरी सहभागी

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर) 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य श्री संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात आयोजित श्री दुर्गामाता दौडीचा अकलूज विभागातील समारोप विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी महादौडीने झाला. नऊ दिवस भक्ती, शौर्य आणि देव, देश, धर्माप्रती निष्ठेचा जागर करण्यात आल्यानंतर ही महादौड उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

यामध्ये अगदी लहान मुलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.या महादौडीमध्ये अंबाबाई, महालक्ष्मी माता, रेणुका माता, सप्तशृंगी माता, नवदुर्गा, बाळूमामा, खंडोबा, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊसाहेब आणि हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या शूर मावळ्यांच्या वेशभूषांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या जिवंत देखाव्यांमुळे अकलूजकरांना इतिहास, भक्ती आणि शौर्यपरंपरेची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.विशेषतः जुना बाजारतळ येथील नागोबा कट्टा येथे धारकरी बांधवांनी सादर केलेला पावनखिंडीचा देखावा महादौडीचे विशेष आकर्षण ठरला. बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची गाथा साकारणाऱ्या या देखाव्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.महादौडीदरम्यान विविध ठिकाणी ध्वजपूजा करून ध्वजाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. माने-देशमुख परिवार, आदिशक्ती नवरात्र उत्सव मंडळ, अंबाबाई मंदिर, टोंगळे परिवार यांनी ध्वजाचे स्वागत केले. तसेच कुंभार परिवार, पलंगे परिवार, किल्ला परिसरातील माता-भगिनी, गुरव परिवार, मयुरेश्वरी मंडळ आणि शनी मंदिर परिसरातील माता-भगिनी यांनी ध्वजपूजा केली.

भूतनाळ परिवार आणि धनंजय गाडे परिवार यांनीही महादौडीचे विशेष स्वागत केले.महादौडीसाठी अकलूज मल्टीस्पेशालिटीचे सर्वेसर्वा विकास शिंदे यांनी ५० फेट्यांची, तर प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक युवराज दोरकर यांनी ५० फेट्यांची व्यवस्था करून सहकार्य केले. त्याबद्दल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अकलूज विभागाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. नऊ दिवस दररोज चहाचे नियोजन करणाऱ्या सर्व ध्वजवाहकांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले.या महादौडीच्या यशस्वितेसाठी सर्व धारकरी बंधू आणि रणरागिणींनी एकजुटीने अथक मेहनत घेतली. नियोजनापासून ते प्रत्यक्ष आयोजनापर्यंत प्रत्येकाने आपापली जबाबदारी निष्ठेने पार पाडली. देव, देश आणि धर्मासाठी निस्वार्थपणे वेळ, श्रम आणि सेवा अर्पण करणाऱ्या प्रत्येकाचे योगदान मोलाचे ठरले.देव, देश आणि धर्मासाठी आपण काय योगदान देतो, हे अधिक महत्त्वाचे आहे, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली. या महादौडीच्या यशासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अकलूज विभागाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button