solapur

लेखणी निर्भीड नांगराची मूठ घट्ट आणि तत्वाशी आढळ निष्ठा ! संघर्षातून घडलेले पत्रकारितेचे आधारवड भारत मगर;अँड.अल्ताफ आतार

लेखणी निर्भीड नांगराची मूठ घट्ट आणि तत्वाशी आढळ निष्ठा !

संघर्षातून घडलेले पत्रकारितेचे आधारवड भारत मगर;अँड.अल्ताफ आतार

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)

पत्रकारिता ही पदवी घेऊन येत नाही, ती संघर्षातून घडते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे आदरणीय भारत (तात्या) मगर जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार म्हणून ज्यांचा लौकिक आहे, त्या तात्यांचा प्रवास राजमार्गावरून झालेला नाही. तो झाला आहे खाचखळग्यांनी भरलेल्या पायवाटेवरून, गरिबीशी झुंज देत, कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेत.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. गरिबीची. कुटुंबाचा थोरला मुलगा म्हणून संपूर्ण घराची जबाबदारी तात्यांवर होती. शिक्षण घेता घेता पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी माळशिरस तालुक्याचे श्रेष्ठ कायदेतज्ञ तथा निमगावचे सुपुत्र ॲड. एम. एम. मगर आणि माळशिरस वकील संघटनेचे ज्येष्ठ सदस्य तथा माजी अध्यक्ष ॲड. डी. ए. फडे यांच्याकडे क्लार्क म्हणून काम सुरू केले.त्या क्लार्कच्या खुर्चीने त्यांना दोन गोष्टी दिल्या. एक – कोर्टातील कामकाजाचे अगाध ज्ञान, कायद्याची समज, आणि दुसरी – सामान्य माणसाचे दुःख जवळून पाहण्याची दृष्टी. याच कोर्टाच्या आवारातून त्यांच्या मनात पत्रकारितेचा छंद अंकुरला आणि तोच छंद आज वटवृक्ष झाला आहे.तात्या केवळ पत्रकार नाहीत, ते काळ्या आईचे खरे सेवक आहेत. शेती हा त्यांचा केवळ व्यवसाय नाही, तर साधना आहे. निमगाव आणि निमगाव परिसरातील सर्व बागायतदार शेतकऱ्यांशी हितगुज करत, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत त्यांनी शेतीचा हातखंडा सिद्ध केला आहे.आज निमगाव परिसरात एक उत्कृष्ट, पुरोगामी आणि संवर्धनशील शेतकरी म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. सकाळी शेतात घाम गाळायचा आणि दुपारी न्यायासाठी लेखणी झिजवायची, हा त्यांचा दिनक्रम आजच्या तरुण पत्रकारांसाठी शिकवण आहे संचार’, ‘तरुण भारत’, ‘लोकमत’, ‘पुढारी’, ‘प्रभात’ पासून ते ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाच्या ‘लोकसत्ता’ दिव्य मराठी पर्यंतच्या ४ दशकांच्या प्रदीर्घ प्रवासात तात्यांनी कधीही आपली निष्पक्षता सोडली नाही. “पत्रकारिता ही केवळ बातम्या प्रसारित करण्याची स्पर्धा नाही, ती समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे.”कोणत्याही पक्षाचा पुरस्कार नाही, कोणाचा आकस नाही. दोन्ही बाजू समजून घेऊन सत्य मांडणे, हाच त्यांचा स्थायीभाव.म्हणूनच आज माळशिरस तालुक्यातीलच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील लहान-थोर पत्रकारांचे ते हक्काचे ‘तात्या’ झाले आहेत. संकटात सापडलेल्या पत्रकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि नवोदितांना घडवणारे चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे तात्या आमचे भाग्य आहे की निमगावच्या मातीने, ॲड. एम. एम. मगर आणि ॲड. डी. ए. फडे साहेबांसारख्या कायदेतज्ञांच्या मुशीत घडलेला एक हिरा आज आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभला आहे. वकिली, पत्रकारिता आणि शेती या तिन्ही क्षेत्राचा समन्वय साधणारे व्यक्तिमत्व दुर्मिळ आहे.तात्या, तुम्ही ६५ वर्षे पूर्ण करून ६६ व्या वर्षात पदार्पण करत आहात. तुमचा हा संघर्षमय प्रवास आम्हा सर्वांसाठी दीपस्तंभ आहे.तुम्हाला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो आणि तुमची लेखणी आणि नांगराची मूठ अशीच घट्ट राहो, हीच आई तुळजाभवानी आणि काळ्या आई चरणी प्रार्थना 

ॲड.अल्ताफ बादशहा आतार(माळशिरस)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button