solapur

निवेदन अन् सातत्यपूर्ण पाठपुरावा ; अकलाई देवी मंदिराकडील रस्त्याचे काम पूर्ण

निवेदन अन् सातत्यपूर्ण पाठपुरावा ; अकलाई देवी मंदिराकडील रस्त्याचे काम पूर्ण

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर) 

अकलूजचे ग्रामदैवत श्री अकलाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरील खड्डेमय रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व भाजप अकलूज शहराच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीला यश आले असून, अकलूज नगरपरिषदेने या ठिकाणी नवीन रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे मंदिराकडे ये-जा करणाऱ्या भाविकांसह स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

श्री अकलाई देवी हे अकलूजचे ग्रामदैवत असल्याने नवरात्रोत्सवात मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक आणि पायी जाणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडूनही होत होती.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व भाजप अकलूज शहराच्या वतीने २८ सप्टेंबर २०२६ रोजी अकलूज नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. मा.आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
या पाठपुराव्यानंतर नगरपरिषदेने संबंधित ठिकाणी नवीन रस्त्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, सार्वजनिक सुविधांसाठी केलेल्या मागणीची दखल घेतल्याबद्दल भाजप  पार्टी अकलूज शहराच्या वतीने नगरपरिषदेचे आभार मानण्यात आले.या वेळी भारतीय जनता पार्टी अकलूज शहराचे उपाध्यक्ष विक्रम गायकवाड,सरचिटणीस अमोल माने, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष जतीन वायदंडे आणि शशिकांत ननवरे उपस्थित होते.भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी केलेल्या मागणीची दखल घेऊन रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button