solapur
लक्ष्मी कळसाईत जयंती साजरी

लक्ष्मी कळसाईत जयंती साजरी
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथील लोहार समाजाचे अध्यक्ष यशवंत अर्जुन कळसाईत यांच्या मातोश्री लक्ष्मी (माया) अर्जुन कळसाईत यांच्या 57 व्या जयंतीनिमित्त उपस्थितांनी विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला.श्री विश्वकर्मा संघटना-अकलूज तर्फे (लोहार गल्ली -नवीन बाजार तळ -संग्राम नगर) येथील अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी.दिपालीताई वाघमोडे
(नगरसेविका अकलूज प्रभाग क्रमांक 8),
.संतोष कृष्णा वाघमोडे,यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी श्री विश्वकर्मा संघटनेचे महादेव पवार, योगेश शिंदे, समिर थोरात, अंकुश थोरात, रूषिकेश राजमाने आदि उपस्थित होते.



