सोलापूर जिल्ह्यात राजकीय धमाका राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला खिंडार पडणार ?

सोलापूर जिल्ह्यात राजकीय धमाका राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला खिंडार पडणार ?
संचार वृत्त अपडेट
मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, सोलापूर सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे, माढ्याचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे आदींनी गुरुवारी मुंबईतील ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी माने यांनी सोलापूर विमानतळाच्या कार्यक्रमात तर पाटील यांनी श्रीपूर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या भेटीमुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित आणि विक्रमसिंह यांनीही या दोन्ही नेत्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. यावेळी मोहोळचे माजी आमदार यशवंत माने हेही उपस्थित होते.
सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे यांच्यासह बिज्जू प्रधाने, सुरेश पाटील, सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, कल्पना क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर या सर्वांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही भेट घेतली. लवकरच सोलापुरात मेळावा घेऊन आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.



