solapur

ठामनिर्णय क्षमतेमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या विश्वासामुळेच अनेक गुन्हे उघडकीस वाढदिवसा निमित्त शुभेच्छा ; शिवकुमार मदभावी

ठामनिर्णय क्षमतेमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या विश्वासामुळेच अनेक गुन्हे उघडकीस वाढदिवसा निमित्त शुभेच्छा ; शिवकुमार मदभावी

संचार वृत्त अपडेट 

महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष व जनतेत विश्वास निर्माण करणारे अधिकारी नीरज उबाळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. अकलूज येथे कार्यरत असलेले उबाळे यांनी आपल्या प्रामाणिक व तत्पर कार्यपद्धतीमुळे नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
कायद्याचे पालन, गुन्हेगारीवर आळा घालणे तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्वरित मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असून युवकांना कायद्याबाबत जागरूक करण्यासाठी ते विविध माध्यमातून प्रयत्न करत आहेत.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त सहकारी अधिकारी, मित्रपरिवार व अकलूजकर नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, यश आणि अधिकाधिक समाजसेवेची संधी लाभो, अशा शुभेच्छा सर्वत्र व्यक्त केल्या जात आहेत.

आदरणीय,साहेब,
आपण फक्त वरिष्ठ अधिकारी नाही, तर आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहात. प्रत्येक अडचणीत योग्य दिशा दाखवून आत्मविश्वास देणारे आपले नेतृत्व आम्हाला सदैव उभारी देते. आपल्या ठाम निर्णयक्षमतेमुळे आणि कर्मचाऱ्यांवरील विश्वासामुळेच अनेक गुन्हे यशस्वीरीत्या उघडकीस आले आहेत.
आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!        शुभेच्छुक–शिवकुमार मदभावी.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button