ज्ञानदेव खरात यांचा सन्मान

ज्ञानदेव खरात यांचा सन्मान
संचार वृत्त अपडेट
सकल धनगर मल्हार सेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी ज्ञानदेव खरात यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अण्णासाहेब शिंदे (युवक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना),संग्राम भोसले (माजी उपसरपंच ग्रामपंचायत माळीनगर),लक्ष्मण डोईफोडे (ग्रामपंचायत सदस्य माळीनगर),महादेव बंडगर (शिवसेना नेते) शिवाजी सावंत, विकास कांबळे,ई.मान्यवर उपस्थित होते.
या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सोरमारे यांनी श्री.खरात यांना याबाबतचे नियुक्तीपत्र दिले श्री. खरात हे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज या संस्थेतून 33 वर्षे माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा करून निवृत्त झाले आहेत. धनगर समाज राजकीय दृष्ट्या सक्रिय व आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे तसेच या पदास योग्य न्याय देऊन संघटना वाढीस व बळकटी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



