solapur

सा.नई गस्त टाइम्स वृत्तपत्राच्या माध्यमातून संस्थापक संपादक चांद शेख यांनी पत्रकारितेला नवा आयाम मिळवून दिला : बी टी शिवशरण

सा.नई गस्त टाइम्स वृत्तपत्राच्या माध्यमातून संस्थापक संपादक चांद शेख यांनी पत्रकारितेला नवा आयाम मिळवून दिला : बी टी शिवशरण

संचार वृत्त अपडेट

माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे सुमारे बत्तीस वर्षांपूर्वी नव्या उमेदीने आपल्या वैचारिक प्रगल्भता व साहित्यिक पिंड असलेलें कवी मनाचे सौंदर्यवादी दृष्टिकोन असलेले तसेच सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक अध्यात्मिक व पुरोगामी विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी चांद शेख यांनी साप्ताहिक नई गस्त टाईम्स हे साप्ताहिक सुरू करुन वृत्तपत्र सृष्टीच्या इतिहासात माळशिरस तालुक्यात पत्रकारितेला नवा आयाम मिळवून दिला विशेष म्हणजे पत्रकारितेतील कोणताही अनुभव पाठीशी नसताना अत्यंत व्यापक व प्रबोधनात्मक वारसा जपण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवर राजकीय घडामोडी सांस्कृतिक वैचारिक वाटचाल यांना आपल्या साप्ताहिक नई गस्त टाईम्स या वृत्तपत्राच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला समाजातील अंधश्रद्धा बुरसटलेल्या विचारांना मातीत गाडण्यासाठी सडेतोड लिखाण करून भ्रष्ट व मुजोर यंत्रणेला उघडे पाडून प्रशासन हलवणयाची ताकद या वृत्तपत्राच्या माध्यमातून तमाम माळशिरस तालुक्यातील जनतेला दाखवून दिली साप्ताहिक नई गस्त टाईम्स या वृत्तपत्राला बत्तीस वर्षे होत आहेत संस्थापक संपादक चांद शेख यांनी या वृत्तपत्राच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील अनेक समस्या अडचणी यावर आवाज उठवला तालुक्यातील गावागावात वार्ताहर नेमले तालुका जिल्हा प्रतिनिधी नेमले मी सरपंच बोलतोय माझी शाळा हे सदर चालू केले ते खूप गाजले तसेच व्यसन मुक्ती लैंगिक समस्या यावर तज्ञांचे लिखाण असलेले सदर अनेक वर्षे चालविले यामध्ये सुप्रसिद्ध लैंगिक समस्या तज्ञ डॉ लिना मोहाडीकर यांनी अनेक वर्ष सदरात लिखाण केले या साप्ताहिक मध्ये काम करण्यासाठी माळशिरस पंढरपूर इंदापूर मंगळवेढा बार्शी करमाळा माण आटपाडी सोलापूर तसेच पुणे येथून ही अनेक प्रतिनिधी यांनी काम केले अनेक नवोदित कवी लेखक वार्ताहर यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले त्यामुळे साप्ताहिक नई गस्त टाईम्स मुळे आता पर्यंत शंभरहून अधिक वार्ताहर पत्रकार तयार झाले हे सांगायला अभिमान वाटतो त्यातील अनेक वार्ताहर यांची सुरूवात नई गस्त टाईम्स मधून झाली ते जिल्हा दैनिकात आता काम करतात संस्थापक संपादक चांद शेख हे मुस्लिम असूनही त्यांनी त्यांची जात धर्म कधी आड येऊ दिला नाही आपण माणूस आहोत माणूस हीच सर्वांची जात असली पाहिजे या विचाराने त्यांनी संस्कृती अध्यात्म सर्वधर्मसमभाव राष्ट्राभिमान तसेच महापुरुषांच्या विचारांचा आपल्या वृत्तपत्रातून सातत्याने प्रसार केला चांद शेख हे कलासक्त विचार व नैसर्गिक सौंदर्यवादी दृष्टिकोन असलेले हरहुन्नरी चतुरस्त्र साहित्यिक कवी पत्रकार आहेत दरवर्षी साप्ताहिक नई गस्त टाईम्स चे वार्षिक दिपावली अंक अत्यंत सुंदर उत्कृष्ट दर्जेदार महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत साहित्यिक कवी यांचे कसदार व दमदार लिखाण असलेले साहित्य दिवाळी अंकात देऊन वाचकांच्या पसंतीस व राज्यात चर्चेत व मान्यवरांच्या कौतुकास प्राप्त झालेल्या नई गस्त टाईम्स दिवाळी अंकास अनेक राज्यस्तरीय व प्रतिष्ठेचे पुरस्कार सन्मान मिळाले आहेत अनेक दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ नट नट्या यांचे उत्ताण भडक फोटो देऊन वाचकांची अभिरुची बिघडवणारे दिवाळी अंक प्रकाशित होत मात्र पुरोगामी व संस्कृतीचे संवर्धन राष्ट्रपुरुष अध्यात्मिक परंपरा जपण्यासाठी पुणे सोलापूर येथील नामवंत चित्रकार यांच्या कुंचल्यातून साकारलेली चित्रे महापुरुषांचे तैलचित्र साधु संतांचे फोटो बनवून दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ बनवले आहेत त्यामुळे दरवर्षी एक स्पेशल विषय घेऊन त्यावर संपूर्ण दिवाळी अंक दर्जेदार व आकर्षक वाचनीय प्रकाशित करण्यात आले यामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत गाडगेबाबा संत कबीर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती धर्मरक्षक संभाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले या व असे अनेक पुरोगामी विचार व प्रबोधनात्मक वारसा जपण्यासाठी दिवाळी अंक प्रकाशित केले आहेत संपूर्ण राज्यभरात नई गस्त टाईम्स दिवाळी अंकांची वाचक आतुरतेने वाट पाहत तसेच अनेकांना कमालीची उत्सुकता राहायची या वर्षी दिवाळी अंकाचा विषय काय असू शकेल तसेच मुखपृष्ठ काय असेल या वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक अध्यात्मिक उपक्रम लिखाणातून मांडले दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय पुजा केली जाते तसेच अनेक नेते खासदार आमदार कार्यकर्ते नेते यांना व्हिआयपी पास मुळे पांडूरंग व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी त्यांचीच गर्दी होते हा विषय घेऊन देहू ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर व राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यातून आलेल्या मान्यवर संतांच्या पालख्या व पालखीतील दिंडीत घालणारे दिंडी प्रमुख यांना मुख्यमंत्री यांच्या बरोबर महापुजेचा मान मिळावा म्हणून स्पेशल अंक प्रकाशित करून विशेष आर्टिकल लिहिली आहेत तसेच कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात मुक्कामाचे ठिकाणी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची आरती म्हटली जात नव्हती यांवर साप्ताहिक नई गस्त टाईम्स मध्ये यांवर सडेतोड आवाज उठवला आहे तत्कालीन काही पालखी सोहळ्यातील प्रमुख यांनी असे उत्तर दिले की जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची आरती रामेश्वर भट यांनी लिहिलेली म्हणायची की संत निळोबाराय यांनी लिहलेली यांवर त्यांच्यात चर्चा व बैठक होऊन आता दरवर्षी संत निळोबाराय यांनी लिहिलेली जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची आरती ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात मुक्कामाच्या ठिकाणी म्हटली जात आहे माळशिरस तालुक्यातील अनेक राजकीय सामाजिक घडामोडींची इत्यंभूत माहिती लिखाण संवाद या माध्यमातून झाला आहे या वृत्तपत्राचे लौकिक व नावामुळे अकलूज येथील नई गस्त टाईम्स या वृत्तपत्राच्या कार्यालयात राज्यातील अनेक थोर विचारवंत लेखक नेते कवि साहित्यिक तसेच सामाजिक राजकीय नेते या मान्यवरांनी आवर्जून भेटी दिल्या आहेत यामध्ये विधानसभेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भारदे सुप्रसिध्द ग्रामीण कथा लेखक बाबा कदम संगीतकार राम कदम पार्थ पोळके अर्चना कुलकर्णी डॉ यु म पठाण प्रसिद्ध कवी मारुती कटकधोंड सुप्रसिध्द चित्रकार हेमंत कपुरे ए आय मुजावर खलील खान ए आय नलामंदू गस्त मध्ये सुरुवातीला लिखाण केलेले अनेक कवी लेखक साहित्यिक म्हणून आता नावारूपाला आले आहेत बार्शी चे कवी प्रकाश गव्हाणे सिताराम गोसावी आनंद पाठक अवंतिका पांढरे सौ अनुपमा पंडित अशी अनेक नावे सांगता येतील तसेच आता अनेकांनी स्वतःचे वर्तमान पत्र पोर्टल न्यूज यु ट्यूब चॅनेल सुरू केली आहेत गस्त टाईम्स ला मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा दर्पण पुरस्कार बार्शी चे स्वर्गीय सितादेवी सोमाणी पुरस्कार अमरावती चा चक्रधर स्वामी पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था यांचा आदर्श संपादक पुरस्कार पुणे येथील काव्यांजली संस्थेचा राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार सन्मान  सदर साप्ताहिक अकलूज येथे सिकंदर प्रिंटिंग प्रेस मध्ये ट्रेडल मशिनवर खिळे जुळवून ब्लाक तयार केला जात होता व पुर्ण अंकांची जुळणी झाल्यावर सोलापूर येथे दैनिक तरुण भारत मध्ये छापला जायचा सदर साप्ताहिक दर शुक्रवारी नियमित सुरू होते प्रेस मध्ये पाच ते सात कामगार यासाठी पुर्ण पगारावर होते वृत्तपत्र चालवणं एवढे सहज सोपे नव्हते परंतु संपादक चांद शेख यांनी सर्वांना विश्वासात घेऊन प्रत्येकाला लिखाणाची जबाबदारी दिली होती जिल्ह्यातील तालुक्यातील महत्वाचे ठिकाण सांस्कृतिक वार्षिक जत्रा जयंती पुण्यतिथी यांवर स्पेशल पुरवणी अंक काढून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे लुमेवाडी येथील सुप्रसिध्द फत्ते मोहंमद जोधपुरी बाबा यांचे जिवन चरित्र वर संपूर्ण माहिती असलेले लिखाण दुर्मिळ फोटो यांवर विशेष अंक प्रकाशित केला होता तसेच अकलूजला राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा यांचे स्पेशल विषय घेऊन राज्यातील नामवंत संगीत बारी कला केंद्र यांच्यातील सुप्रसिध्द लावणी कलावंत यांच्या विशेष मुलाखती घेऊन पुरवणी अंक प्रकाशित केले आहेत जे दैनिकात येणं अपेक्षित आहे ते साप्ताहिक नई गस्त टाईम्स मध्ये देऊन वाचकांना मेजवानी दिली आहे अकलूज मधील अनेक सामाजिक राजकीय परिवर्तनवादी घटना प्रसंग दुर्मिळ माहिती आठवणी अधोरेखित केल्या आहेत अनेक प्रासंगिक सामाजिक फोटो आठ कॉलम पहिल्या पानावर हेडिंगला दिले आहेत या वृत्तपत्रा मुळे तालुक्यात अनेक छायाचित्रकार नावारूपाला आले आहेत हमालाचा सोलापूर जिल्हा परिषदेचा समाजकल्याण सभापती झाला हे हमाल नामदेव गायकवाड यांना वेळोवेळी प्रसिध्दी दिली आहे त्यामुळे ते सभापती झाले एका दिवंगत सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बातमीने जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली होती त्याच असं झालं की सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात अकलूज शंकरनगर येथील शिक्षक दांपत्य बदली साठी आले होते त्यांनी मोहिते पाटील यांचेकडून आलो असल्याचे सांगितले तेव्हा तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष त्वरित म्हणाले मोहिते पाटलांच्या कुत्र्याने जरी काम सांगितले तरी ते आम्हाला ऐकावे लागते तशीच बातमी पहिल्या पानावर हेडलाईन्स दिली होती मोहिते पाटलांच्या कुत्र्याने जरी काम सांगितले तरी आम्हाला ऐकावेच लागते सदर अंक जिल्ह्यात खूपच गाजला मोहिते पाटील यांचे कार्यकर्त्यांचे त्या अध्यक्षांना फोन गेले आम्ही मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते आहोत मग आम्ही काम सांगतोय म्हणजे आम्ही कुत्रे आहोत का जाहीर माफी मागा अन्यथा राजीनामा द्या म्हणून त्यांना धारेवर धरले तेव्हा ते अध्यक्ष लाल दिव्याची गाडी घेऊन अकलूज ला या वृत्तपत्राच्या कार्यालयात आले व सदर बातमी देऊन मला अडचणीत आणले मी तुमची माफी मागतो तुम्ही खुलासा करावा म्हणून विनंती करू लागले त्यांचं लेखी निवेदन घेऊन अध्यक्षस्थानी नजरचुकीने काही बोलले त्या बद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त केल्याचा चार ओळी खुलासा केला तेव्हा कुठे सदर विषय थांबला नई गस्त टाईम्स च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गेल्या बत्तीस वर्षांचा घेतलेला हा आढावा सर्व वाचकांना आमचे हितचिंतक मित्र परिवार जाहिरातदार यांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

• सत्तेला जाब विचारणे आणि सामान्य माणसाचा आवाज बनणे, ही भूमिका त्यांनी सातत्याने जपली

शहर जिल्हा प्रस्थापितांच्या चौकटी मोडून पत्रकारितेला तळागाळातील माणसाशी जोडण्याचे काम साप्ताहिक ‘नई गस्त’चे संस्थापक संपादक चाँद शेख यांनी केले आहे. गेल्या ३० वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या साप्ताहिकाने निर्भीड लेखन, स्थानिक प्रश्नांना प्राधान्य आणि वाचकांशी थेट संवाद या तत्त्वांवर भर देऊन पत्रकारितेला नवा आयाम दिलाआहे.’नई गस्त’ने सुरुवातीपासूनच शेतकरी, मजूर, महिला आणि वंचित घटकांच्या समस्या ठळकपणे मांडल्या. प्रशासनाच्या दिरंगाईवर बोट ठेवणाऱ्या बातम्या, भ्रष्टाचार उघड करणारे वृत्त आणि सकारात्मक बदल घडवणाऱ्या उपक्रमांची दखल घेणे या धोरणामुळे साप्ताहिकाने वाचकांचा विश्वास संपादन केला.चाँद शेख यांनी पत्रकारितेचा खरा धर्म म्हणजे सत्तेला जाब विचारणे आणि सामान्य माणसाचा आवाज बनणे, ही भूमिका त्यांनी सातत्याने जपलआहे.

(लक्ष्मीकांत कुरुडकर ,पत्रकार)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button