solapur

वीरशैव दिनदर्शिका चे प्रकाशन व महादेव मंदिरास टीव्ही संच भेट

वीरशैव दिनदर्शिका चे प्रकाशन व महादेव मंदिरास टीव्ही संच भेट

संचार वृत्त अपडेट 

सालाबाद प्रमाणे  महादेव मंदिर,बसवेश्वर चौक  महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय संस्था,अकलूज यांनी वीरशैव दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन लिंगायत समाजाचे अध्यक्ष  गोपाळ गुळवे,महालिंग राऊत तसेच समाजमंडळ व जेष्ट मार्गदर्शक  तात्यासोा गुळवे, चंद्रकांत नाना,अशोक शेटे, नागेश नष्टे,आण्णा आर्वे,नगरसेवक विलास शिरसागर,महेश शेटे,रामलिंग सोनके,डॉ चंदन सरताळे,दिग्विजय शेटे,उदय शेटे,प्रा.रामलिंग सावळजकर सर,सुनील जठार,राजमाने ,पप्पू आंधळकर,उमेश नडगिरे महादेव मंदिर पुजारी जगदीश स्वामी व महिला अध्यक्ष  राजश्री गुळवे,सोनाली शेटे,कीर्ती शेटे ,स्वामी समाज बांधव यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.


  यावेळी नवीन टीव्ही संच मंदिर मधे मा.अध्यक्ष व समाजबांधव यांना १०८ राजगुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज भंढारगृह शिखर शिंगणापूर यांच्या अभिष्टचिंतना निमित्त सुपूर्त करण्यात आला.


 सावळजकर यांनी मनोगत व्यक्त केले व संस्थेच्या कार्याचे कौतुक व अभिनंदन केले,तसेच वृक्षारोपणाचा मोलाचा संदेश दिला.
कार्यक्रमासाठी महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय संस्थेचे  सचिन गुळवे,शिवकुमार गुळवे,संदीप कुंभार,भीमाशंकर वैद्य,योगेश गुळवे,सोमनाथ कथले,गणेश नरुळे,गणेश उंबरदंड,हृषिकेश शेटे,विश्वनाथ बनगार,महेश डिकोळे,मंगेश नरुळे,सुजित बामणकर,राहुल पाटील,संतोष मालगावे यांनी परिश्रम घेतले.योगेश गुळवे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button