माढा विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी दिलेला शब्द पाळला
माढा विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी दिलेला शब्द पाळला
श्रीपूर
बी टी शिवशरण ज्येष्ठ पत्रकार
माढा विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील घरातील कोणी उमेदवार नसणार असल्याचे जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले होते तो शब्द मोहिते पाटील यांनी पाळला आहे त्यामुळे मोहिते पाटील यांच्या वरील विश्वास सोलापूर जिल्ह्यात वाढला आहे दिलेला शब्द पाळला जातोच असे नाही त्यामुळे राजकारणात सारेच अलबेल असते आज बोललेल उद्या विसरतात अशी परिस्थिती आहे तत्व निष्ठा आदर विश्वास हे बोलायला सोपे आहे पण प्रत्यक्षात कोणी त्याप्रमाणे वागत नाही त्यामुळे राजकारणात कोणी कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न निर्माण होतो आहे माढा विधानसभा निवडणुकीत शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी गेल्या चार महिन्यांपासून माढा विधानसभा मतदारसंघात गावभेट संपर्क सुरू ठेवला होता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कडून तुतारी हातात घेण अवघड नव्हते पण लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील निवडून आल्यानंतर जयसिंह ऊर्फ बाळदादा यांनी सांगितले की माढा विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांचे घरातील कोणी उमेदवार नसणार आहे त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उत्सुकता वाढली होती माढा विधानसभा निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील की शिवतेजसिंह मोहिते पाटील निवडणूक लढणार पण बाळदादा यांनी दिलेला शब्द पाळला व मोहिते पाटील यांचे घरातील कोणीही उमेदवार माढा विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवणार नाही