महायुती कडून रिपाई(आ.)पक्षाला योग्य जागा न दिल्यास वेगळा विचार केला जाईल
महायुती कडून रिपाइं (आ.) पक्षाला योग्य जागा न दिल्यास वेगळा विचार केला जाईल – किरण धाईंजे
अकलूज (प्रतिनिधी)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीने महायुतीत राहण्यासाठी आजपर्यंत ठाम आणि कठोर भूमिका घेतली आहे.वेळोवेळी प्रत्येक निवडणुकीत सहकार्य केलेले आहे.तसेच राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदासजी आठवले साहेब व रिपाइं मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी जीवाचे रान करून महायुतीचे उमेदवार निवडून आणून आमदार,खासदार केले.
तसेच जिकडे ना.आठवले साहेबांची राजकीय ताकद असेल त्यांचीच सत्ता महाराष्ट्र सहीत देशात येते हे जग जाहीर असून सुद्धा त्यांना फसविण्याचे पाप महायुती करत आहे.आमचा निर्णय झाला आहे.आम्ही महाराष्ट्रील युवक आठवले साहेब व राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत.महायुतीच्या नेत्यांनी जर आम्हाला व आमच्या राजकीय नेत्यांना राजकीय अपमान करत असाल तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल तसेच महायुतीत रिपाइं ला
दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) चे महाराष्ट्र युवक आघाडीचे उपाध्यक्ष किरण धाईंजे यांनी ठणकावून सांगितले.या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला योग्य सन्मान आणि जागा दिल्या नाहीतर वरिष्ठांच्या आदेशानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल.