खंडकरी शेतकऱ्यांचे वर्ग दोनची वर्ग एकचे सातबारे वाटप
खंडकरी शेतकऱ्यांचे वर्ग दोनची वर्ग एकचे सातबारे वाटप
संचार वृत्त
पंचायत समिती कार्यालय माळशिरस या ठिकाणी उपविभागीय अधिकारी माळशिरस व तहसील कार्यालय माळशिरस यांच्यावतीने महसूल पंधरावडाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कामाचा आढावा ची बैठक व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा संत तुकाराम महाराज पालखी सोळा व सोपान महाराज पालखी सोहळा स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय सैनिक हो तुमच्यासाठी महसूल संवर्गातील निवृत्त सेवा कर्मचारी उत्कृष्ट कर्मचारी व लोकसभा निवडणूक उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान व शेती महामंडळ यांच्यामधील लाभार्थी शेतकरी यांचे सातबारा वाटप यांचा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी खंडकरी शेतकऱ्यांचे वर्ग दोनचे वर्ग एकचे सातबारे व आदेश खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री लाडककी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरगर हे होते तर कार्यक्रमाला प्रांत अधिकारी विजया पांगारकर तहसीलदार सुरेश शेजवळ नायब तहसीलदार अमोल कदम नायब तहसीलदार जावीर नायब तहसीलदार विकास व्यवहारे, भानुदास सालगुडे पाटील सोमनाथ पिसे, व
माळशिरस तालुक्यातील ज्याचा सन्मान झाला असे मंडल अधिकारी गावकामगार तलाठी व कोतवाल व इतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोखंडे भाऊसाहेब यांनी केले