दै.तरुण भारत वृत्त समूहाच्या वतीने सन्मान
अकलूजचे जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार यांचा दै.तरुण भारत वृत्तसमुहाच्या वतीने सन्मान
मोहिते-पाटील परिवाराची तीन पिढ्यांची बातमीदारी करणारे पत्रकार.
संग्रामनगर(संजय लोहकरे यांजकडून)माळशिरस तालुक्यातील जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार यांनी वृत्तपत्र क्षेत्रातील सेवेला चाळीस वर्षे पूर्ण केल्याबद्दल सोलापूर येथील दैनिक तरुण भारत वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यामध्ये ज्येष्ठ निरोपणकार तथा तरुण भारत मीडिया लिमिटेडचे अध्यक्ष व माजी संपादक विवेकजी घळसाशी यांच्या हस्ते व तरुण भारतचे मुख्य कार्यकारी संचालक दिलीप पेठे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
चंद्रकांत कुंभार यांनी आपल्या पत्रकारीतेची सुरुवात पुणे तरूण भारत पासून केली होती.विजयसिंह मोहिते यांनी त्याकाळात पुणे तरूण भारत वृत्तपत्राचे संपादक चित्तरंजन पंडीत यांच्या कडे शिफारस करून पत्रकार होण्याची संधी प्राप्त करून दिली.त्यानंतर पुढे सोलापूर तरूण भारत वृत्तपत्राची आवृती निघाली. त्यापासून आज तागायत पर्यंत सोलापूरच्या दैनिक तरुण भारत मधून पत्रकारीतेचे काम करीत आहेत.गेली चाळीस वर्षे दैनिक तरूण भारत वृत्तपत्र समुहामध्ये बातमीदारीतेचे काम करतआहेत. दै.संचार, दै.केसरी या दैनिकांचेही काम केलेले आहे. मोहिते पाटील परिवाराशी पत्रकारिता करत तीन पिढ्यांचा स्नेह त्यांनी साभाळला. कार्यक्रमासाठी तरूण भारत वृत्तपत्राचे आजपर्यंतचे सर्व संपादक हजर होते त्यामध्ये नारायण कारंजकर,अरविंद जोशी,अरुण करमरकर,अनिल कुलकर्णी,राजा माने,विजयकुमार पिसे व प्रशांत माने हजर होते. यावेळी तरुण भारत वृत्तपत्राच्या वतीने आजी-माजी कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता.त्यामुळे अनेक जुने सहकाऱ्यांच्या गाठीभेटी झाल्या हा अत्यंत अविस्मरणीय प्रसंग सर्वांना अनुभवायास मिळाला असे चंद्रकांत कुंभार यांनी सांगितले.