मालवण मधील पुतळा दुर्घटनेचा निषेध कंत्राट दारावर कारवाईची मागणी
मालवण मधील पुतळा दुर्घटनेचा निषेध कंत्राट दारावर कारवाईची मागणी
संचार वृत्त
मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजितदादा पवार गट ) यांच्यातर्फे या दुर्घटनेबद्दल निषेधार्थ आज दिनांक २९/८/२०२४ गुरूवार सकाळी ११ ते १२ यावेळी संपूर्ण राज्यात काळी फित बांधून मूक निषेध व्यक्त करण्यात आला तसेच मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेबद्दल कंत्राट दारावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पुन्हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा यासंदर्भात शासकीय यंत्रणेला निवेदन देण्यात आले म्हणून अकलूज मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
व अकलूज येथील उपविभागीय कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , पीपल्स रिपब्लिकन पार्टी , शेतकरी संघटना यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद सदस्य, राज्य उपाध्यक्ष सा मा न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा अशोकराव गायकवाड , महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना, हाटकर समाज महासंघाचे अध्यक्ष भिमराव भूसनर पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष माळशिरस तालुका राहुल ढेरे , अकलूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष राजीव गायकवाड , माळशिरस तालुका पीपल्स रिपब्लिकन पार्टी युवक अध्यक्ष सचिन मोरे , सेवा निवृत्त कृषी अधिकारी मा अरविंद पगारे, बंडखोर साप्ताहिक पेपर मुख्य संपादक गौतम भंडारे , सिध्दार्थ जगताप आदी उपस्थित होते .