solapur

राणे पिता पुत्रांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कायदा व सुव्यवस्था व अब्रूची लक्तरे वेशीवर टराटरा फाडून टाकली

राणे पिता पुत्रांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कायदा व सुव्यवस्था व अब्रूची लक्तरे वेशीवर टराटरा फाडून टाकली

संचार वृत्त

श्रीपूर (बी.टी. शिवशरण जेष्ठ पत्रकार)

मालवण येथील राजकोट स्मारक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अचानक पडल्याने राज्यात राजकीय सामाजिक वातावरण तापलं आहे काल आदित्य ठाकरे यांच्या मालवण दौऱ्यात राणे पिता पुत्रांनी व स्वतः खासदार नारायण राणे यांनी जे वर्तन केले जी दहशतीची भाषा वापरली व वातावरण बिघडवणारी परिस्थिती निर्माण केली हे पाहता राणे यांनी आपल्या गुंड व दहशतवादी कृत्याचा पोलिसांसमोर जो तमाशा केला आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याच्या अबरुची लक्तरे वेशीवर टराटरा फाडून टाकली आहेत आणि ज्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था राखण्याची नैतिक जबाबदारी आहे ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अळी मिळी गुपचिळी या प्रमाणे तोंडावर पट्टी बांधून गप्प आहेत वास्तविक पाहता राणे यांनी पोलिस अधिकारी मिडिया चे पत्रकार तेथील महिला यांना उद्देशून जी भाषा वापरली आहे हे लांच्छनास्पद आहे पोलिसांच्या समोर कायदा सुव्यवस्था यांचे धिंडवडे काढले आहेत एवढं होऊनही नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत बेलगाम भाषा अरेरावी व मग्रुरी करणारी वक्तव्ये केली आहेत हे महाराष्ट्रातील सुसंस्कृत व पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र असलेल्या राज्याला धक्का पोहोचवणारे कृत्य आहे एवढे होऊनही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही कोणताही गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे ते नक्की कोणत्या प्रकारची पाठराखण करत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरील जनतेचा विश्वास उडाला आहे नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार आहेत आणि ते एखाद्या सराईत गुंडा प्रमाणे अरेरावी करतात मारुन टाकले जाईल आमचा इतिहास माहीत नाही का बघुन घेतो सोडणार नाही तसेच महिला पत्रकार यांना धमकावतात हे त्यांचे वर्तन पुरोगामी महाराष्ट्रात निश्चितच खेद जनक आहे या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नाहीत कारवाई करत नाहीत त्यामुळे हे राज्य नेमके कोणत्या पाऊलवाटेने जात आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button