solapur

काशेगाव चे वसंत नाना देशमुख पांडुरंग परिवारापासून वेगळी चूल मांडणार

काशेगाव चे नेते वसंतननाना देशमुख पांडुरंग परिवारापासून वेगळी चुल मांडणार

नाना नेमकी कुणाबरोबर नुरा कुस्ती खेळत आहेत

संचार वृत्त

श्रीपूर(बी.टी.शिवशरण.ज्येष्ठ पत्रकार)

नुकतीच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन व माजी उपसभापती वसंतननाना देशमुख यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असल्याचे माध्यमातून समजले नाना हे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या तालमीत तयार झालेले नेतृत्व आहे तसेच ते पांडुरंग परिवाराचे दुसर्या फळीतील नेते म्हणून ओळखले जातात आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ते अशी वेगळी भुमिका घेत आहेत हे नक्की समजायला मार्ग नाही ते आक्रमक व बंडखोर नेते आहेत पण एकीकडे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी अद्याप नक्की धोरण भुमिका ठरलेली नाही असे असताना त्यांचे विश्वासू सहकारी असलेले नाना अचानक कार्यकर्त्यांची अशी वेगळी भुमिका घेतात हे असंबद्ध वाटते नाना नेमकी कुणाबरोबर नुरा कुस्ती खेळत आहेत हे लक्षात येत नाही माध्यमातून ते परिचारक गट सोडणार हे वृत्त व्हायरल झाले आहे पण ते कदापी पांडुरंग परिवारापासून वेगळे होतील असे म्हटले तर हास्यास्पद आहे मोठे मालक कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक लढले त्या वेळी कासेगाव गटात मालकांना मताधिक्य कमी झाले तेव्हा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन असलेले वसंतननाना देशमुख यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती परंतु मोठे मालक सुधाकरपंत परिचारक यांनी तुझा काय दोष आहे तु राजीनामा कशासाठी देत आहे तु राजीनामा वगैरे काही देण्याच्या भानगडीत पडू नको म्हणून त्यांना थांबवलं होते पांडुरंग परिवार परिचारक घराणे यांच्याशी नानांचे ऋणानुबंध अनेक वर्षांचे राहिले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांची वेगळी बैठक वेगळी भूमिका सवता सुभा हे काही न पटणारे आहे वसंतननाना देशमुख हे त्यांचे महाविद्यालयीन जिवनापासून असलेले मित्र स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या बरोबर सामाजिक राजकीय सांस्कृतिक वाटचालीत सक्रिय राहिलेलं नेतृत्व आहे त्यामुळे त्यांनी सध्या माध्यमातून त्यांच्या संदर्भात ज्या बातम्या येत आहेत त्यांचा खुलासा केल्यास पंढरपूर मंगळवेढा व माळशिरस तालुक्यात जी उलटं सुलट वंदता व अफवा पसरली आहे त्याला पुर्ण विराम मिळु शकेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button