संग्राम नगर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
संग्रामनगर येथे श्री कृष्ण जन्माष्टमी निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
संग्रामनगर येथे श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव २०२४ निमित्त १ सप्टेंबर रोजी कृष्णप्रिया मल्टीफंक्शनल हाॅल येथे विविध धार्मिक कार्यक्रमाने कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन), इस्कॉन नामहट्ट प्रचार केंद्र अकलूज यांच्या वतीने श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.१ सप्टेंबरला सायंकाळी ४ ते ५ भजन,५ ते ६ दान कर्त्यांचा अभिषेक,६ ते ७ प्रवचन,७ ते ८ सांस्कृतिक कार्यक्रम,नाटीका नृत्याचा कार्यक्रम, रात्री ८ ते ८:३० छप्पन भोग दर्शन, महाआरती व त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.तरी या श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त सर्व भाविक व भक्ततांनी विविध अध्यात्मिक कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे अवाहन गजेंद्र फुले,गोकुल वासी दास,दयाळू विठोबा दास यांनी केले आहे.