solapur
मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन
मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन.
अकलूज (संचार वृत्त)
इंडियन मेडिकल असोसिएशन अकलूज,संग्रामनगर-अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलचे डॉ.एम.के.इनामदार आणि पुणे येथील प्रसिद्ध संचेती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 22 सप्टेंबर २०२४ रोजी मोफत मणक्याच्या आजारावरील तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीराविषयी तसेच संचेती हॉस्पिटलच्या माध्यमातून राबवल्या जाणारे विविध उपक्रम,उपचारासाठी असलेल्या अत्याधुनिक सुविधा याबाबत डॉ.पराग संचेती हे संवाद साधण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी डॉ.पराग संचेती,डॉ.एम.के.इनामदार, डॉ.अमोल शिंदे,डॉ.संतोष खडतरे,डॉ.संजय सिद,डॉ.नितीन राणे,डॉ.निखिल मिसाळ,डॉ. शैलेश हदगावकर,डॉ.विश्वास कदम आदी उपस्थित होते.
त्याची क्षणचित्रे…(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)