political

कुंडलिक रेडे पाटील यांच्या पश्चात त्यांच्या गटाचे सक्षम नेतृत्व करणारे युवा नेते राहुल आप्पा रेडे पाटील

कुंडलीकराव रेडे पाटील यांच्या पश्चात त्यांच्या गटाचे सक्षम नेतृत्व करणारे युवा नेते राहुल अप्पा रेडे पाटील

श्रीपूर(बी.टी.शिवशरण जेष्ठ पत्रकार)

महाळुंग श्रीपूरचे दिवंगत लोकप्रिय नेते कुंडलीकराव रेडे पाटील यांचे अकस्मात निधनानंतर त्यांच्या गटाचे सक्षम नेतृत्व करणारे युवा नेते राहुल अप्पा रेडे पाटील यांनी आपल्या गटाला उभारी देऊन सर्व कार्यकर्ते नेते यांना एकत्रित ठेवून सामाजिक राजकीय काम तेवढ्याच जोमाने ताकदीने सुरू ठेवले आहे आमदार बबनदादा शिंदे यांचे समर्थक असलेला त्यांचा गट विकास कामे सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला आहे राहुल अप्पा रेडे पाटील यांचा विनम्र स्वभाव सर्वसामान्य माणसाला आपला माणूस म्हणून त्यांचे सुखादुखात ते व त्यांचे सर्व सहकारी सहभागी असतात महाळुंग श्रीपूर नगरपंचायत सार्वत्रिक पहिल्या निवडणुकीत राहुल अप्पा यांचे नेतृत्वाखाली उभे केलेल्या पेनलचे सहा नगरसेवक निवडून आले दोन तीन उमेदवार कमी मताने पराभूत झाले राहुल अप्पा यांना साथ देऊन त्यांचे बरोबर कायम असणारे त्यांचे सहकारी मौला पठाण विक्रमसिंह लाटे मारुती उर्फ बापू रेडे राजेंद्र वाळेकर अमरसिंह पिसाळ देशमुख रावसाहेब सावंत पाटील दादासाहेब लाटे लक्ष्मण आतार अशोक चव्हाण शिवाजी रेडे रत्नाकर झगडे नामदेव पाटील अप्पा खुळे विकास जाधव त्रिंबक वाळेकर जगदीश इंगळे शिवादादा बाळासाहेब भगत गणेश कदम बंडू काळे ज्ञानेश्वर हाके वजीर डांगे पांडुरंग इंगळे व इतर असंख्य कार्यकर्ते आहेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार बबनदादा शिंदे यांचे माध्यमातून महाळुंग येथील ग्रामदैवत यमाई देवी मंदिर सभामंडप कल्लोळ ओवरी व इतर अनेक प्रलंबित कामे सुरू आहेत रेडे पाटील हे नगरपंचायतचे गटनेते म्हणून अँक्टिव्ह आहेत राजकारणाचे वेळी राजकारण असते विकासात्मक कामे करताना कोणी राजकारण आणू नये या मताचे ते आहेत कुंडलिकराव रेडे पाटील यांचे सर्व सहकारी मित्र यांचा राहुल अप्पा नेहमी सन्मान देऊन त्यांच्याशी ते आदराने वागतात विकास संस्था सामाजिक उपक्रम यात ते कधी ढवळाढवळ करत नाहीत होऊ देत नाहीत राहुल अप्पा हे युवा नेतृत्व असले तरी सामाजिक राजकीय वैचारिक व बदलत्या काळानुसार त्यांच्याकडे प्रगल्भता आहे ते संयमी सोशीक म्हणून ओळखले जातात पण जिथं विनाकारण गरज नसताना कोणी आडवे येतात त्यांना मात्र त्यांच्यातील लढाऊ आक्रमक बाणा दाखवतात ते गावाचे भल्यासाठी विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन कार्यरत असतात त्यांचे वैशिष्ट्य असे की एवढ्या अल्प वयात ते मुरब्बी जाणकार नेतृत्वा प्रमाणे सक्रिय आहेत हे त्यांचं वेगळेपण आहे ते निर्व्यसनी आहेत गावगाडा समाजकारण राजकारण यांचा त्यांनी जवळून अभ्यास केला आहे निवडणुकीत त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या गटाचे त्यांनी उभे केलेल्या त्यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा प्रचार ते निवडून आणायचेच या आत्मविश्वास व खात्रीने ते प्रचार करतात त्यामुळे त्यांचा एकही कार्यकर्ता किंवा त्यांचे फिक्स मतदार कधी फुटतं नाहीत आमदार बबनदादा शिंदे युवा नेतृत्व रणजितसिंह शिंदे यांचे सहकार्य तसेच त्यांच्या माध्यमातून महाळुंग श्रीपूर मध्ये अनेक विकासकामे करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेले रस्ते गटारीची कामे भुमीगत गटारीचे काम सुरू आहे समाज मंदिर अंगणवाडी स्मशानभूमीची स्वच्छता दुरुस्ती कामं होत आहेत गावाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न होत असल्याने नागरीकातुन समाधान व्यक्त होत आहे राहुल अप्पा यांचा गावातील सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमात वावर व सहभाग असतो छत्रपती शिवाजी महाराज जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नरवीर उमाजी नाईक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती यामध्ये ते सक्रिय असतात नगरपंचायतचे गटनेते म्हणून त्यांची दमदार कामगिरी आहे शासनाच्या माध्यमातून सर्व योजना उपक्रम शासकीय कार्यक्रम यशस्वी पणे राबविण्यासाठी त्यांचा गट सदैव तत्पर व पुढे असतो राहुल अप्पा हे कार्यक्रमात नेहमी बोलतात आम्ही कुठेही राजकारण करणार नाही विकासात्मक कामे व गावाच्या भल्यासाठी आम्ही सर्वांसोबत आहे त्यावेळी आम्ही निधी वाटपात गटबाजी वशिला याला महत्त्व देणार नाही युवा नेते राहुल अप्पा रेडे पाटील यांचे कडून महाळुंग श्रीपूर मधील नागरिकांना खूप अपेक्षा आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली गावाची भरभराट विकास झाला पाहिजे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button