solapur

सोलापूर जिल्ह्यात राजकारणात खळबळ बलाढ्य नेते बीजेपी मध्ये राजकीय समीकरणे बदलणार का ?

सोलापूर जिल्ह्यात राजकारणात खळबळ बलाढ्य नेते बीजेपी मध्ये राजकीय समीकरणे बदलणार का ?

संचार वृत्त अपडेट 

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीपासून ते शिवसेना उबाठापर्यंतच्या अनेक नेत्यांनी भाजपात  प्रवेश करत दाखल होत सत्ताधारी पक्षाची ताकद वाढवली आहे.

मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर, माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपाचा झेंडा हातात घेतला. साताऱ्यातील माण-खटाव भागातही राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकारी आणि मराठवाड्यातील शिक्षक नेत्यांनी भाजपात प्रवेश करून भाजपाचा विस्तार आणखी रुंदावला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण  यांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला मंत्री जयकुमार गोरे, अतुल सावे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, अनुराधा चव्हाण, राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चव्हाण यांनी यावेळी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून हे सर्व नेते भाजपात आले आहेत.” तर मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “सोलापूरच्या राजकारणात ताकद असलेले नेते आता भाजपाच्या खांद्याला खांदा लावून काम करतील.”

नव्या प्रवेशकांपैकी राजन पाटील म्हणाले, “मोहोळचा स्वाभिमान वाचवण्यासाठी आम्ही भाजपात आलो आहोत.” तर रणजीतसिंह शिंदे यांनी भाजपाच्या विजयासाठी झोकून देऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. फक्त सोलापूरच नव्हे तर सातारा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली अशा ठिकाणांहूनही शिक्षक व शिक्षणाधिकारी वर्गातील मान्यवरांनी भाजपात प्रवेश करून आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यातील दक्षिण भागात आता “भाजपाची वादळं” उठत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे – आणि त्याची पहिली चाहूल आजच्या या मोठ्या पक्षप्रवेशाने स्पष्टपणे मिळाली आहे.यामुळे राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय समीकरणे बदलणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button