मोबाईल व आधुनिकीकरणाच्या युगात वाचन संस्कृती जपणे काळाची गरज; किशोरसिंह माने पाटील
मोबाईल आणि आधुनिकीकरणाच्या युगात “वाचन संस्कृती “जपणे काळाची गरज; किशोरसिंह माने पाटील
संचार वृत्त
आज जग हे 21 व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आणि तंत्रज्ञान, आधुनिकरण आणि मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती ही लुप्त होत चाललेली आहे त्यामुळे आजच्या तरुण पिढी मध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचे प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे मत अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील यांनी राऊत नगर अकलूज येथील संकेतिका वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी” टाइम्स 45 न्यूज “चे संपादक –हुसेन मुलाणी हे होते
प्रास्ताविक संकेतिका वाचनालयाचे सर्वश्री क्षीरसागर गुरुजी यांनी करून त्यांच्या आजवरच्या सामाजिक उपक्रमाचा आढावा घेतला
पुढे बोलताना किशोरसिंह माने पाटील म्हणाले की वाचन हे केलेच पाहिजे वाचनामुळे ज्ञानात भर पडते आणि जो वाचेल तोच वाचेल याप्रमाणे तरुण पिढीने दिवसातून एक तास दोन तास तरी वाचन केले पाहिजे आज संकेतिका वाचनालयाचे उद्घाटन झाले आणि या वाचनालयाचे सर्वश्रेष्ठ क्षीरसागर गुरुजी हे दोन-तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले असताना सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आजही विना मोबदला विना वेतन ते चाकोरे येथे अध्यापनाचे कार्य करत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले
याप्रसंगी जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक- गायकवाड गुरुजी, माळेवाडी चे माजी सरपंच -अरुण खंडागळे ,संपादक- हुसेन मुलानी यांनी मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी सेवानिवृत्त जगताप गुरुजी, गायकवाड गुरुजी ,प्रल्हाद नवगन ,बाबासाहेब शिंदे ,सलीम खान पठाण ,महादेव राजगुरू ,अश्फाक बागवान, याकूबभाई शेख ,सिद्धेश्वर भिंगे ,शब्बीर शेख , उमाजी माने, ताजुद्दीन नाईकवाडी, जोहर आवटी, राजेंद्र माने ,प्रशांत लावंड , अन्नदाते गुरुजी,बाळासाहेब शिंदे, एकनाथ कदम, निसार पठाण, प्रदीप राजगुरू ग्रामपंचायत माजी सदस्य गणेश वसेकर, उत्तम पाखरे, प्रमोद पाटील, आदी मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप राजगुरू यांनी केले तर समाजसेवक हमीद मुलांणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.